कर्जमाफी,बोंडअळी अनुदान, पीकविमा पासून वंचित शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणार- मा.आ.जेथलिया परतुर/प्रतिनिधि,परतूर विधानसभा मतदारसंघात सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती असुन शेतकरी अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहे. तोंडाशी आलेली पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर अत्यंत भयावह संकट उभे आहे. त्यातच ज्या पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही जे शेतकरी पीक विम्या पासून वंचित राहिले आहेत.ज्यांना बोंडअळी अनुदानाचा लाभ मिळाला नाही अशा अनेक शेतकर्यानी कार्यालयात संपर्क करावा ज्या योगे पात्र शेतकऱ्यानं करीता पाठपुवठा करण्यास्तव सोयीचे होईल अशी माहिती मा. आ . सुरेशकुमार जेथलिया यांनी दिली आहे. पीककर्ज माफी,पीकविमा, बोंडअळी अनुदान आदि योजननं पासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांना दिलासा देण्यास्तव वंचित अशा मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंठा येथील कार्यालयात,नेर -सेवाली भागातील शेतकऱ्यांनी वाटूर येथिल कार्यालय,व परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी परतूर येथे संपर्क केल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यास्तव पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करता येतील त्या स्तव शेतकऱ्यांनी दि.03अक्टो 2018ते 10 अक्टो 2018 दरम्यान संपर्क साधावा असे आवाहन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.