जालना येथील अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल मुंबई येथे एलड्रोक इंडिया पुरस्काराने सन्मानित. परतूर -जालना येथील अनिल जिंदल वर्ल्ड विद्यालयास एलड्रोक इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून दि 27 सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात, या विद्यालयाचे प्राचार्य प्रविण कुमार झेजर, यांना एलड्रोक इंडियाचे एक्झिकेटिव्ह डायरेक्टर, गुरूदीप अग्रवाल, यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या सम्मेलना मध्ये देशभरातील 200 च्यावर प्राचार्यांनी व शैक्षणीक संस्था चालकांनी भाग घेतला होता,समिटच्या अंतर्गत शैक्षणीक क्षेत्रामध्ये जगभरात होत असलेल्या शैक्षणीक विकासा बदल चर्चा करून येथे अवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.