संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातून दर्जेदार शासनकर्ते आणि विद्यार्थी घडतील : सी.एल. थुल औरंगाबाद: निजामाकडून मराठवाडा लढून महाराष्ट्रात घ्यावा लागला. त्यानंतर मराठवाड्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नव्याने सुरुवात करून विकास साधायचा असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चांगले शासनकर्ते आणि अधिकारी निर्माण होतील, असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती सी.एल. थुल (सदस्य, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग) यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) मान्यताप्राप्त संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनप्रसंगी रविवारी (ता. ३०) अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अतुल सावे, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी उपमहापौर संजय केणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, चंद्रकांत कांबळे, प्रकाश बच्छाव, जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम, एसएससी बोर्डाचे अध्यक्ष रमेश गिरी, डॉ. अरविंद सावते, डी.जे. वाकोडे, डॉ. संतोष जाधव, सुभाष मोळवणे, वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीकांत नवले, रमेश नागपाल, माजी महापौर तरविंदर सिंग धिल्लन आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री. थुल म्हणाले, कि संबोधी अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे हे शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकाहून अधिक काळापासून कार्यरत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये शैक्षणिक चळवळ सुरु केली. त्यांच्या विचारधारेला अनुसरून भीमराव हत्तीअंबीरे यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले. परभणी आणि हिंगोलीनंतर मराठवाड्याची राजधानी औरंगाबादच्या मुख्य प्रवाहात त्यांनी हे केंद्र सुरु केले. या केंद्रात दर्जेदार प्रशस्त क्लासरूम आणि ग्रंथालय असून विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. फक्त पुस्तक वाचून सुशिक्षित होता येत नसते, त्यासाठी सुसंस्कृत प्रशिक्षण केंद्र लागतात. या केंद्राच्या माध्यमातून चांगले शासनकर्ते निर्माण होतील. यात शंका नाही. पुण्यानंतर औरंगाबाद हे विद्येच माहेरघर आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला लाजवेल अशा सुविधा यावेळी आमदार अतुल सावे म्हणाले, कि संबोधीच्या रूपाने औरंगाबादमध्ये पहिले प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे. याठिकाणी कॉर्पोरेट क्षेत्राला लाजवेल अशा सुविधा आहेत. येथून नक्कीच चांगले अधिकारी निर्माण होतील. हळूहळू एकाचे तीन ते चार केंद्र औरंगाबादमध्ये होतील, अशा शुभेच्छा. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल आमदार राहुल पाटील म्हणाले कि, डिजिटल क्लासरूम, व्हर्चुअल लर्निंग सेंटर आणि अद्यावत ग्रंथालय असल्याने इथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. परभणी आणि हिंगोलीत आम्ही या संस्थेच काम पाहिलंय. त्याच जोमाने हे काम औरंगाबादमध्ये सुरु राहील यात शंका नाही. संबोधी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. प्रास्ताविक भाषणात संबोधी अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे यांनी सांगितले कि, नव्याने सुरु होत असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. फक्त मागासवर्गीयच नव्हे तर सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र फायद्याचे ठरणार आहे. प्रशिक्षण केंद्र सुरु करतांना आलेल्या असंख्य अडचणीवर मात करणाऱ्यासाठी सातत्याने मदत करणाऱ्या सर्वांचे आभार. यावेळी विजय काणेकर, सुरेश पेडगावकर, राजेंद्र साबळे, अशोक मुळवणे, सागर जाधव, डी.एस. टोणपे, कैलास कांबळे, जनार्दन म्हस्के, सुरज कदम, रमेशभाई खंडागळे, चंद्रकांत हिवराळे, विवेक पेद्दी, हरेश सिद्दिकी, कार्यकारी अभियंता मधुकर गायकवाड, रमेश कांबळे, कृष्णा भंडारे, सर्वेश्वर कोटुळे, सुजाता पोहरे, कॅप्टन सुरेश गायकवाड, नंदकिशोर शहाणे, विजय सुबुकडे पाटील आणि प्रभाकर जैस्वाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाटील यांनी तर आभार डॉ. अरविंद सावते यांनी मानले. निरालाबाजार येथील वीर सावरकर चौकातील निर्माण भारती सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर सुरु होणाऱ्या संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन श्री. हत्तीअंबीरे यांनी केले आहे.