औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसतर्फे यलगार यात्रा औरंगाबाद जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे औरंगाबाद जिल्ह्यात यलगार यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे़ या यात्रेला औरंगाबाद जिल्ह्यातुन उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, सदर यात्रा हि दि़२४ सप्टेंबर रोजी क्रांतीचौक येथुन यात्रेस सुरुवात झाली़ त्यानंतर ही यात्रा पूर्ण सोयगाव, सिल्लोड, फुलंब्रीमधील गणोरी येथे मुक्कामी यात्रा शनिवार दि़ 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद तालुक्यात सावंगी, लाडसावंगी, करमाड व गोलटगाव या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली़ यात्रेस औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार , माजी आमदार डॉ, कल्याण काळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे मार्केट कमिटी औरंगाबाद चे माजी सभापती संजय औताडे जिल्हा परिषद सदस्य संतोष शेजूळ, रेणुका सुरेश शिंदे, मीनाताई रामराव शेळके, बबन कुंडारे पंचायत समिती सदस्य सुभाष भालेराव, किसन राठोड अर्जुन शेळके पंचायत समितीच्या सभापती ताराबाई उकिरडे आधी का पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राफेल घोटाळा प्रकरणी त्यांनी मोदीसरकावर टीकास्त्र सोडले़ लाडसावंगी येथे सभेदरम्यान माजी आमदार डॉक़ल्याण काळे बोलतांना म्हणाले की, यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून हे सरकारला दिसत का नाही सरकार दुष्काळ जाहीर करायला उशीर का लावतो दुधाला भाव नाही पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ मोदी आपल्या हसऱ्या चेहऱ्याचे फलक पेट्रोल पंपावर लावतात पंतप्रधान घरकुल आवास योजना ची काय परिस्थिती आहे किती जणांना घरकुल मिळाले शेतकऱ्याना विज बिल भरल्या शिवाय डीपी देण्यात येणार नसल्याचे अधिकारी सांगत आहेत़ जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रार्दुभावाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले, सरकारने त्यावर काहीही उपाय योजना केल्या नाहीत़ , मी आणि अब्दुल सत्तार साहेबांनी बोंडअळी या मुद्दावर बीटी कंपनीवर करमाड येथे गुन्हा दाखल केला होता़ तेंव्हा कुठे सरकारला जाग आली आणि ३०० कोटी रुपये बोंडअळी साठी औरंगाबाद तालुक्याला सरकारने दिले़ हे सरकार झोपल्याचे सोंग घेत आहे़ लाडसावंगी सभेदरम्यान कल्याण काळे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले़ सभेमध्ये काकासाहेब कोळगे, जहीर शेख, बाबासाहेब मोकळे, मनोज शेजूळ, अंकुशराव शेळके, संमत खॉसाब, भगवान मुळे, श्रीमंत दांडगे, गजानन मते, नारायण मते, दत्तुलाला तारो, कैलास उकिर्डे, भास्कर मुरमे, भाउसाहेब जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते़