भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे महाराष्ट्र प्रातीय अधिवेशन संपन्न औरंगाबाद प्रतिनिधी - अध्यात्मयोगी आचार्य श्री.१०८ विशुध्दसागरजी महाराज ससंघाच्या उपस्थितीत व खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत राजाबजार च्या तत्वध्यानामध्ये भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा महाराष्ट्र प्रांतच्या धर्मसंरक्षणी तिर्थसंरक्षणी श्रृत संवर्धनी पदाधिका-यांची सभा व अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलकुमारजी सेठी नवि दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २९ सप्टेबर २०१८ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री.हिराचंद कासलीवाल प्रांगण शहागंज येथे आयोजीत करण्यात आले होते. सर्व प्रथम सभेचे दिप प्रज्वलन राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलकुमार सेठी,धर्मसंरक्षणी महाराष्ट्र प्रांताध्यक्ष सुमेर काला,कार्याध्यक्ष देवेंद्र काला,महामंत्री डी.बी.पहाडे,पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी,सचिव अशोक अजमेरा,डी.यु.जैन,तिर्थसंरक्षणीचे महामंत्री महावीर ठोले,अध्यक्ष प्रकाशकाका पाटणी,डी.बी.कासलीवाल आदींनी दिप प्रज्वलन करâन कार्यकमाची सुरâवात करण्यात आली. यावेळी मंगलाचरण शेखर पाटणी यांनी केले. तदनंतर आचार्यश्रीचे पादपक्षालन अशोक जैन रायपुर,सुमेर काला,पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी आदींनी केले. तदनंतर आचार्यश्रींना शास्त्र देण्याचा मान नरेंद्र अजमेरा,पियुष कासलीवाल,कैलास पांडे,प्रपुâल्ल झांजरी यांना मिळाला तदनंतर प्राचीन तिर्थजिर्णोध्दार पुस्ताकाचे विमोचान पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अधिवेशनाचे प्रास्ताविक देवेंद्रकुमार काला यांनी केले. यानंंतर निर्मलकुमारजी सेठी यांनी महासभेच्या गतविधीवत सखोल माहिती उपस्थितांना करâन दिली. तदनंतर आचार्य विशुध्दसागरजी महाराज यांनी आत्मानुशासन या ग्रंथावर आधारीत प्रवचन उपस्थितांना दिले. कार्यव्रâमाचे संचालन अ‍ॅड.डी.बी.कासलीवाल यांनी केले. अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात दुपारी १ वाजेपासुन महाअधिवेशनाला सुरâवात झाली असता मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करâन अधिवेशनास सुरâवात करण्यात आली तसेच आचार्य शांतीसारगजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पन करण्यात आले. यावेळी मंचावर निर्मलकुमारजी सेठी नवि दिल्ली,सुमेरमल काला,देवेंद्र काला,डी.बी.पहाडे,ललीत पाटणी,महावीर ठोले,प्रभात टोग्या डिमापुर,डॉ.प्रकाश पापडीवाल,प्रकाशकाका पाटणी आदी मंचावर उपस्थित होते. तदनंतर प्रास्ताविक देवेंद्रकुमार काला यांनी दिले. तिर्थसंरक्षणी कार्याची सविस्तर माहिती संस्थेचे महामंत्री महावीर ठोले यांनी दिली. यावेळी श्री.क्षेत्र गिरनार च्या संरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी महासभेचे कार्य हे व्यापक पध्दतीचे आहे. समाज तिर्थ क्षेत्र, संरक्षण करणे तसेच प्राचीन तिर्थ क्षेत्राचे जिर्नोदार तिर्थक्षेत्रांना विविध कार्यकमासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच समाजातील विदयार्थी उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्त्ती मिळवुन देणे आदी कामात महासभा पुढे असे असे निर्मलकुमारजी सेठी यांनी सांगीतले. या प्रसंगी डॉ.प्रकाश पापडीवाल यांची नियुक्ती महासभेच्या श्रृतसंवर्धनी या संस्थेवर महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. धार्मिक शिक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी पाठशाळा निर्माण करण्यात याव्यात असे यावेळी ठरले. पंडित निर्माण करण्याची कार्यशाळा घेण्यात यावी असे ठरले यासाठी संयोजक म्हणुन महावीर ठोले व सहसंयोजक म्हणुन अ‍ॅड.एम.आर.बडजाते यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी एम.आर.बडजाते,डॉ.रमेश बडजाते,प्रकाश कासलीवाल,विनोद लोहाडे,अशोक गंगवाल,अशोक अजमेरा,संदिप ठोले,नितीन गंगवाल,महावीर सेठी,विलास पहाडे,अनिल पांडे,सुरेश अजमेरा,प्रदिप अजमेरा,रमनलाल बडजाते,वायकोस गुरâजी,किरण मास्ट,शांतीलाल गांधी फलटण,प्रदिप ठोले सटाणा,सुनिल गोधा धर्माबाद,प्रमोद पांडे,राजकुमार कासलीवाल,सुभाष ठोले,मनोज छाबडा,सुरेश अजमेरा नंदुरबार,संतोष पापडीवाल यांच्यासह महाराष्ट्रातुन विविध शहरातुन आलेल्या कार्यकत्र्याची उपस्थिती होती. शेवटी धर्मसंरक्षणीचे कार्याध्यक्ष देवेंद्रकुमार काला यांनी सर्वाचे आभार मानुन अधिवेशन संपल्याचे जाहीर केले.अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.