भगवाननगर शालेय समितीच्या अध्यक्षपदी सिद्धेश्वर राख तर उपाध्यक्षपदी मारुती चौरे यांची निवड आष्टी (प्रतिनिधी) - परतुर तालुक्यातील भगवानबाबा नगर (आष्टी) या ठिकाणी आज पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाल पुर्ण झाल्याने नविन शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे ठरले. सर्वप्रथम सहशिक्षक यु.बी. मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक धनराज मल्लाडे यांनी शालेय व्यवस्थापन समितीची रचना निवड प्रक्रिया व जबाबदाNया या बाबतची माहिती पालकसभेला देऊन शालेय समिती निवड प्रक्रिया मतदानाद्वारे पालकसभेतून सदस्यांची निवड करण्यात आली. सदरील सदस्यांमदून मतदानाद्वारे अध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर राख व उपाध्यक्ष म्हणून मारुती चौरे यांची निवड करण्यात आली. तसेच या शालेय समितीचे सदस्य म्हणून आशाबाई नांगरे, विजयमाला चौरे, अलका राख, अयोध्या केदार, संदीप नांगरे, रेखा चौरे, विमल चौरे, उच्च शिक्षित लक्ष्मण चौरे, शिक्षक सदस्य यु.बी. मुंढे, शाळेचे मुख्याध्यापक तथा सचिव डी.टी. मल्लाडे आणि प्रमुख उपस्थिती माऊली चौरे, प्रा. अमृत चौरे, भारत तिडके, प्रभाकर केदार, राजाभाऊ आघाव, बाबासाहेब बागल, नारायण घोळवे, शिवाजीराव नांगरे, पत्रकार अंगद मुंढे, पत्रकार गौतम शेळके, संतोष रोहिमल, दादाराव चौरे इत्यादींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सदरील निवड समितीचे गावासह पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.