दिल्लीचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम आज औरंगाबादेत औरंगाबाद (प्रतिनिधी) - दिल्ली राज्याचे समाज कल्याण मंत्री श्री. राजेंद्र पाल गौतम हे आज दिनांक ३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्ली येथून विमानाने औरंगाबाद विमानतळावर सायंकाळी ७.३० वाजता आगमन होईल. तेथून ते सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम राहील. तसेच आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक श्री. ब्रिगेडियर सुधीर सावंत हेही नाशिक येथून जनशताब्दी एक्स्प्रेसने ३० सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ८.१५ वाजता येणार असून सुभेदारी विश्रामगृह येथे मुक्काम राहील. १ ऑक्टोबर २०१८ रोजी सिल्लोड येथे एका खाजगी कार्यक्रमाकरीता हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहे. तसेच सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील ‘आप’ कार्यकत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कार्यक्रम संपल्यानंतर मंत्रीमहोदय व पक्षाचे संयोजक दुपारी २.३० वाजता महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त माजी सैनिकांचा मेळावा महसुल प्रबोधीनी हॉल, अमरप्रित हॉटेल जवळ, शासकीय दुध डेअरीच्या मागे, जालना रोड औरंगाबाद येथे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या नंतर संध्याकाळी विमानाने ते दिल्लीकडे प्रयाण करतील. तरी वरील कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकत्र्यांनी व माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन संघटक सचिव प्रशांत इंगळे, सतिष संचेती यांनी केले आहे.