देवगांव कस्तूरवाड़ी रेती माफिया समोर तहसिल कार्यालय व पोलिस प्रशासनाने गुडघे टेकले का देवगांव-देवगांव कस्तूरवाड़ी या ग्रामीण भागातील लाहूकि नदी कोरून रेती विक्री करणाऱ्या रेती माफिया समोर तहसिल कार्यालय तसेच पोलीस प्रशासनाने गुडघे टेकले आहे अशी चर्चा सामान्य नागरिकांच्या तोंडाने ऐकायला मिळत आहे, लाहूकि नदी ही जागोजागी मोठ-मोठ्या खड्यात रूपांतर झालेली आहे या नादीच्या पात्रातुन रेती माफिया दिवस-रात्र ट्रेक्टर,पिकअप,टिप्पर या द्वारे दररोज रेती तस्करी करतात तसेच तलाठी, ग्रामसेवक, पो.ठाणे बिट अलमदार यांना कोणते ट्रैक्टर कोणाचे आहे, हे सुद्धा माहित आसुन या रेती माफियावर का कार्यवाही होत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तहसिल कार्यालयाला आणि पोलीस प्रशासनाला यांच्या कडून तड़जोडीची आपेक्षा आहे का. रेती माफिया विरोधात खुप वेळा सामान्य नागरिकांनी रेती माफ़ियावर कार्यवाही करण्याची वारंवार तहसिल कार्यलयाकडे मागणी केली असुन त्यावर कोणतेही कारवाई दिसून आली नाही, यामुळे बदनापुर तहसिल कार्यालयाच्या आशा हलगर्जी पणामुळे राज्य महसुल विभागाचे लाखो रूपयांचा दरदिवशी नुकसान होत आहे. रेती माफियावर बदनापुर तहसिल कार्यालय आणि पोलीस प्रशासन महेरबान आहे आसे म्हणायला काहीच वाईट नाही, देवगांव-कस्तूरवाड़ी रेती माफ़ियाना प्रशासनाचे डोळे बंद कसे करावे हे माहीत आहे. तहसील कार्यालयाच्या व बदनापुर पोलीस प्रशासनाच्या या प्रकारच्या झोपी मुळे पण महाराष्ट्र महसुल विभगला दररोज लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. बदनापुर तहसिल कार्यालय व बदनापुर पोलीस प्रशासनाची झोप वरिष्ठ अधिकारी उडवनार की नाही, लाहूकि नदीची जिल्हाअधिकारी यांनी स्व:ता येऊन पाहणी करुण बदनापुर तहसिल कार्यलयातील भरष्ट अधिकारी यांची चौकशी करुण त्यांना निलंबित करावे आणि रेती माफियावर अतिषय कड़क कारवाई करावी आशी मागणी स्थानिक नागिरकामधुन होत आहे.