जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख यांची निवड देवराव डोंगरे (जालना), जावेद बेग (बदनापूर), सुरेश वाहुळे (परतूर), जुनेद खान (भोकरदन) जालना, प्रतिनिधी ः जालना जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांची निवडणुक नुकतीच पार पडली असून जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख (भोकरदन) यांची निवड झाल्याची घोषणा युवक काँग्रेस निवडणुक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मिना यांनी आज गुरूवार रोजी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केल्यानंतर जल्लोषपुर्ण वातावरणात जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. जालना जिल्हा युवक काँग्रेस निवडणुक दि. 09 आणि 10 सप्टेंबर रोजी होती. या दोन दिवसामध्ये जिल्ह्यातील युवक पदाधिकार्‍यांनी आपआपल्या भागामध्ये निवडणुक प्रक्रिया पार पाडली होती. आज गुरूवार रोजी या निवडणुकीचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी श्री. अनिरूद्ध मिना यांनी जाहिर केला. जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून इब्राहीम कायमखानी (परतूर), शेषराव जाधव (जालना), रविंद्र गाढेकर, सतिष गोरे यांची निवड झाली आहे. तर जालना विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून देवराव डोंगरे, शेख सईद, नवीद अख्तार यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. बदनापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जावेद बेग (सेलगांव) यांची निवड करण्यात आली आहे. भोकदन विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जुनेद खान (जाफ्राबाद) यांची निवड झाली आहे तर महेश दसपुते यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. घनसावंगी विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अश्‍विनीताई सातपुते यांची निवड झाली आहे तर कैलास कोरडे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. तर परतूर विधानसभा युवक काँग्रस अध्यक्षपदी सुरेश वाहुळे यांची निवड झाली आहे. युवक काँग्रेस निवडणुकीची प्रक्रिया गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात सुरू होती. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. युवक काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या निवास्थानी शाल आणि पुष्पहाराने जोरदार स्वागत केले. याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, युवक काँग्रेसचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. संजय खडके, मंठा तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, वैभव उगले, शिवराज जाधव, ईरशाद कुरेशी, मोहन इंगळे, जाफ्राबाद अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष जहिर एआर खान, सय्यद खालेद, राज महमंद, जितेंद्र गाढेकर, मो. इब्रान, सलिम मणियार, शेख कलीम, अन्नू भाई, शेख अजीम, गोपाल चित्राल, सागर ढक्का आदी कार्यकर्ते मोठ्या संख्योने उपस्थित होते.