निरोगी मन आणि आरोग्यासाठी युवकांनी मैदनाकडे वळावे - जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर जालना,- लहान वयात व विद्यार्थी दशेतच खेळाच्या स्पर्धा, व्यायाम यामध्ये विद्याथ्र्यांचा सहभाग असला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले.जालना येथील शासकीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मराठवाडास्तरीय शालेय नेटबॉल क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिर्झा अन्वर बेग, प्रमुख पाहुणे नगरसेवक बाला परदेशी, जयंत भोसले, शेख समीम, प्रा. डॉ. हेमंत वर्मा, क्रीडाअधिकारी संजय वनवे, अ‍ॅड. जहिर बियाबानी, घनश्याम खाकीवाले, अमरदिप शिंदे, शेख हमाम यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,खेळामुळे सांघिक भावना, बंधूभाव वाढीस लागून शरीराबरोबरच मनही निरोगी बनते. आयुष्यात येणारे यश-अपयश पचविण्याची क्षमता खेळामुळेच वृध्दींगत होते. आज उपलब्ध सर्व भौतिक सुविधांमुळे शरीराची हलचाल संपल्यात जमा झाली आहे. एकीकडे शरीरीक कष्ट नाहीत. तर दुसरीकडे मात्र मानसिक तणाव वाढत आहे. यामुळे तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह, असे गंभीर आजार दिसून येत आहेत. जागतिक स्तरावर झालेल्या सर्वेक्षणामध्ये येणाNया भविष्य काळात हिंदुस्थानामध्ये मधुमेह व Nहदयाशी संबंधीत आजारांचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढणार असल्याचे निदर्शनास आले आहे. देशाची निरोगी पिढी हीच देशाची खरी संपत्ती असते. म्हणून तरुणांनी मोबाईल, टी.व्ही., संगणनक यावरील खेळामध्येच गुंतवणुन न पडता मैदानावरील खेळात सहभागी व्हावे. व्यायाम करावा, व आपले आरोग्य व मन याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजक शेख चाँद पी.जे. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील संघ सहभागी झाल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात असलेली उदासिनता यावर चिंता व्यक्त केली. तर क्रीडा संकुलाची दुरावस्था व सुविधांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी स्पर्धेचे पंच म्हणून सतिष इंगळे, धमेंद्र काळे यांनी काम पाहिले तर मोहसिन लक्की, गणेश लाहोटी, अबुल नईम, सोमेश काबलिये, प्रा. गावर्धन वाहूळे, नितीन जाधव, प्रल्हाद तिकांडे, कुलदीप बुदेल खंडे, संतोष वाघ, सोपान शिंदे, सचिन पांढरे, मतीन शेख यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.