राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य कार्यशाळा संपन्न औरंगाबाद-संयुक्‍त राष्‍ट्र संघाच्‍या अन्‍न व कृषी संघटनद्वारे सन 2018 हे"मिलेट वर्ष" म्हणून घोषित करण्याचा केंद्रशासन प्रयत्‍न करीत आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पोषक धान्याचा पुरवठा केला जात असून शेतक-यांना योग्‍य मूल्‍य मिळण्‍याच्‍या दृष्टिने या पिकांच्‍या किमान आधारभूत किमतीतही केंद्रशासनाने लक्षणीय वाढ केलीआहे. या विषयास चालना देण्‍यासाठी,दि.28 सप्‍टेंबर 2018 रोजी पुण्‍यातील वैकुंठ मेहता राष्‍ट्रीय सहकारी प्रबंधसंस्‍थान येथे राष्‍ट्रीय स्‍तरावरील पौष्टिक अन्‍नधान्‍य कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी कृषी राज्‍यमंत्री, सदाभाऊ खोत व सहकार व पणन वस्‍त्रोद्योग मंत्री, सुभाष देशमुख यांच्‍या उपस्थितीत केले. या प्रसंगी डॉ. अशोक दलवाई, मुख्‍यकार्यकारी अधिकारी-एन.आर.ए.ए.,डॉ बी. राजेंदर-सहसचिव (कृषी), डॉ.जे.पी.मिश्रा, सल्‍लागार-नीतीआयोग, सौरभगर्ग, कृषीप्रधान सचिव-ओडिशा, सचिन्‍द्रप्रताप सिंह, आयुक्‍त-कृषी, महाराष्‍ट्र राज्‍य व डॉ. के. के. त्रिपाठी, निर्देशक वैमनीकॉम, पुणे तसेच केंद्र व राज्‍यशासनातील वरिष्‍ठ अधिकारी, राष्‍ट्रीय स्‍तरावरील संशोधन संस्‍थाचे शास्‍त्रज्ञ, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या/शेतकरी गट व शेतकरी यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. उद्घाटन सत्राच्या वेळी केंद्रीय कृषीमंत्री यांनी पोषक अन्नधान्यांच्या वेबसाइटचेउ द्घाटन केले. तसेच पौष्टिक अन्‍नधान्‍याच्‍या लोगोचे अनावरण करुन याविषयावरील पुस्तकांचे विमोचन केले.सर्व प्रमुख आदरणीय मान्‍यवरांनी शेतक-यांच्‍या निव्‍वळ उत्पन्नात वाढ होणे गरजेचे असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. तसेच कुपोषणाच्‍या समस्‍येचे निराकरणासाठी, पौष्टिक अन्नधान्य उत्पादन वाढविणे, या अन्‍नधान्‍यांच्‍या किमान आधारभूत किमतीत वाढ करणे, पौष्टिक अन्‍नधान्‍याच्‍या वापराबाबत देशात जनजागृती निर्माण करणे, मूल्‍यवृद्धीसाठी ग्रामीण स्‍तरापर्यंत प्रक्रिया उद्योगांची श्रृंखला निर्माण करण्‍याबाबत भर दिला