भरतीपुर्व सैन्य व पोलीस भरती प्रशिक्षणाकरीता अर्ज करण्याचे आवाहन औरंगाबाद,- औरंगाबाद जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींसाठी भरतीपुर्व सैन्य व पोलीस भरती प्रशिक्षणाकरीता अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, औरंगाबाद यांनी केले आहे.उमेदवार हा अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाचा 18 ते 25 या वयोगटातील असावा, उमेदवारांची उंची पुरुष 165 से.मी. व महिला 155 से.मी. , छाती पुरुष 79 से.मी. ( फुगवून 84 से.मी.), शैक्षणिक पात्रता इ. 12 वी उत्तीर्ण असावा. रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्र, उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा, वार्षिक कौटुंबीक उत्पन्न 1,00,000/- पर्यंत असावे, महिला वर्गासाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. वरील अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा , औरंगाबाद या कार्यालयात दि. 20 ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधून मुलाखतपत्र घेवून श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती येथे सकाळी 11 वा. स्वखर्चाने उपस्थित रहावे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्याचा शासनाच्या खर्चाने असेल. प्रशिक्षणार्थीस जाण्या- येण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी तसेच निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्राच्या सत्यप्रतीसह चार पासपोर्ट साईज फोटो, बेडीग, वाटी, प्याला व दैनंदिन पयोगात लागणारे साहित्यासह उपस्थित रहावे. युवक, युवती यांनी वरील अटींची पुर्तता करुन प्रशिक्षणास हजर रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, औरंगाबाद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी फोन नं. 0240-2402391 या क्रमांकावर संपर्क साधावा.