6 ते 12 ऑक्टोबर सप्ताह माहितीचा अधिकार सप्ताह म्हणून साजरा करा दि.28 सप्टेंबर 2018 हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असुन दि.6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर हा सप्ताह राज्य पातळीवर माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. सप्ताहात शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सर्व, महाविद्यालय, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थेमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निंबध व वत्कृत्व इत्यादी सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यायनमाला आयोजित कराव्यात. तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य व अशासकीय समाजसेवी संस्थाच्या मदतीने समाज कार्यकर्त्याकरीता व इच्छुक गटाकरीता भित्तीपत्र स्पर्धा, चित्रकला, निंबध, वत्कृत्व व व्याख्यानमाला इत्यादी उपक्रम आयोजित करावे व या उपक्रमासाठी परितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स कल्ब, रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थाच्या संयोगाने करणे व जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, जालना यांनी एक आदेशान्वये दिले आहेत.