स्वच्छता ही सेवा अभियान जालना, –‍ ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारत सरकारने स्वच्छता ही सेवा हे अभियान संपुर्ण देशभरात दिनांक १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीमध्ये राबविण्याचे आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,जालना यांनी स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यासाठी जाफ्राबाद तालुक्यातील हिवरा बळी हे गाव दत्तक घेवुन जिल्हयातील माजी सैनिक, विधवा, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने दिनांक २६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९.00 वाजता सदर गावामध्ये स्वच्छता ही सेवा या अभियान सुरूवात करून संपुर्ण गावामध्ये साफ सफाईचे कार्य केले. गावकरी मंडळी व तसेच हिवरा बळी या गावचे सरपंच दशरथ लोखंडे व सचिव प्रमोद पडघान यांनी योग्य्‍ सहकार्य केले. सदर अभियान यशस्वी ककरण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे विनायक अनाळकर, वरीष्ठ लिपीक, युनुस शेख, वसतिगृह अधिक्षक, तुकाराम काकडे, लिपीक, विनायक केंद्रे आणि सुभाष रगडे व तसेच माजी सैनिक संघटना जालना जिल्हयाचे अध्यक्ष कुंडलिक मुठ्ठे साहेब, भोकरदन तालुकाध्यक्ष बबन शिंदे व जिल्हयातील माजी सैनिक, विधवा यांनी मोलाचे योगदान दिले.असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना यांनी कळविले आहे