मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नवीन राजकीय पक्षाची स्थापना करून त्या दिशेने वाटचाल वैजापूर / मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नवीन राजकीय पक्षाची स्थापना करून त्या दिशेने वाटचाल सुरू केलेल्या कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी शहरातील कार्यकत्योच्या उपस्थितीत विचार मंथन बैठक घेतली . या वेळी आ. जाधव म्हणलो की, सध्याच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्वसामान्य नागरिकांशी कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. जनतेच्या प्रश्रावर बोलण्यास बंदी घातली जाते. या घुसमटीमुळेच नवा पक्ष स्थापन करण्याचा विचार पुढे आला. मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिल्यावर अन्य समाजातील नागरिकांना भेट घेऊन त्यांच्याही अडचणी आपल्या समोर मांडल्या त्यामुळे राजकीय वाटचालीत केवळ मराठा समाजापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक अशी भूमिका ठेवली आहे. आतापर्यंतच्या राजकीय जीवनात पक्षांशी नाही तर जनतेशी इमानदार राहिलो , त्यामुळे पक्ष बदलत फिरावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या पक्ष संघटनेच्या बांधणीत प्रत्येक समाजाचा एक उपाध्यक्ष करण्यात येईल तसेच विविध प्रश्राबाबत पक्षाची 20 सदस्यांची कोअस कमिटी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान 1आँक्टोबरपासून तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेण्यात येणार आहे.