झी सिनेमावर ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता ‘धडक’च्या प्रीमिअरसह मधु आणि पार्थवीसोबत पडा प्रेमात दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे असलेल्या दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा काय होतं? ‘दो दिल, एक धडक’च्या ह्या कथेने समाजाच्या बुरसटलेल्या विचारांचे शक्ले मोडली. ‘धडक’ ही एक साधी पण उत्कट अशा पहिल्या प्रेमाची कथा आहे. होम ऑफ ब्लॉकबस्टर्स झी सिनेमावर रविवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता धडक चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर आहे. शशांक खेतान दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात ईशान खट्टर आणि नवतारका जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असून आशुतोष राणा, अंकित बिश्त, श्रीधर वत्सर यांच्या सहभूमिका आहेत. ‘धडक’ ही एक प्रेमकथा असून यात निरागस हृदये कशी विचार करत नाहीत, विचार करून पावले उचलत नाही, ती फक्त धडधडतात हे पाहायला मिळते. यात वास्तविकता असून आपल्या समाजात खोलवर रूजलेल्या पूर्वग्रहांकडेही एका वेगळ्‌या दृष्टीने पाहिले जाते. धडकच्या वर्ल्ड टीव्ही प्रीमिअरच्या निमित्ताने जान्हवी कपूर म्हणाली, “ह्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना आणि जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हासुद्धा मला खूप सकारात्मक ऊर्जा लाभली. हा चित्रपट माझ्यासाठी जणू एक व्यक्तिगत प्रवास होता आणि तो मला सर्वांसोबत वाटायचा होता. हा माझा पहिलाच चित्रपट होता, त्यामुळे पार्थवीची व्यक्तिरेखा म्हणून कसे वाटते हेच मी शिकले नाही तर भूमिका पडद्यावर सर्वोत्तम प्रकारे कशी साकारायची याबद्दलही काही क्लृप्त्या शिकले. ‘धडक’ हा चित्रपट कायमच माझ्या हृदयाच्या जवळ राहिल आणि यातील प्रत्येक क्षण अन्‌ क्षण दीर्घ काळ माझ्या स्मरणात राहिल.” उदयपुरमध्ये त्यांच्या प्रेमाला कशाचीच पर्वा नसते, पण पुढे मुंबई आणि मग कोलकाता येथे त्यांना स्वतःचे पोट भरण्यासाठी मेहनत करावी लागते आणि मग त्यांना कळते की एकत्रपणा हा नेहमीच आनंद घेऊन येतोच असे नाही. काय ह्या प्रेमकथेचा शेवट आनंदी होईल?