आखिल भारतीय जात्थ्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत व उच्च शिक्षण बचाव निर्धार सभा परतुर-देशाच्या विकासासाठी गुणवत्तापुर्ण व वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवणाऱ्या शिक्षणाची गरज - डॉ. विक्रमसिंग (राष्ट्रीय महासचिव एस एफ आय) दी 12. स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा अखिल भारतीय जत्था जालना जिल्ह्यात भेदभाव विरहित गुणवत्तापूर्ण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवणाऱ्या शिक्षणाची मागणी घेऊन निघालेल्या जत्थ्याचे स्वागत परतुर येथे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.या सभेला संबोधित करतांना विक्रम सिंह म्हणाले की, देशाची शिक्षणव्यवस्था अतिशय बिकट परिस्थितीतुन जात आहे. शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. UGC चे अस्तित्वच या सरकारने धोक्यात आणले आहे. देशाच्या नामांकित विद्यापीठांवर हल्ले करुन उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व सरकारी, अनुदानित शिक्षण केंद्रांना बदनाम केले जात आहे. यातून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मोडित काढण्याचे सरकारचे मनसूबे असल्याचे दिसून येते. म्हणून खऱ्या अर्थाने देशाच्या विकासासाठी भेदभाव विरहित असे गुणवत्तापुर्ण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवीणाऱ्या शिक्षणाची आज नितांत गरज आहे. अशी निकड त्यांनी व्यक्त केली.त्याचबरोबर देशात विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक अडचनींना सामोरे जावे लागत आहे.. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे अशी खंत SFI च्या राज्य उपाध्यक्ष साथी मंजुश्री कबाड़े यांनी व्यक्त केली त्याचबरोबर SFI चे राज्य सचिव मंडळ सदस्य साथी नितिन वाव्हळे यांनी देखील सभेला संबोधित केले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तिड़के सर हे होते. यावेळी विचार मंचावर SFI चे केंद्रीय सचिव मंडळ सदस्य साथी दत्ता चव्हाण, राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव अनिल मिसाळ, रोहिदास जाधव, शिवाजी तोगरवार, नवनाथ मोरे, यांची उपस्थिती होती. सूत्र संचालन रेखा काकडे, पल्लवी बोरडकर यांनी केले तर आभार SFI चे जालना जिल्हाध्यक्ष आनंद वाकळे यांनी केले. यावेळी बलवंत काळे ( ता.अध्यक्ष),गौरव चव्हाण, करण भेसर, ममता पाचोड़कर, अमोल हिवाळे, यश गिराम, सुमित मानकर,संदया सिध्नकर , रेखा अंभोरे, मुक्ता बोराडे, प्रियंका साकलकर ईत्यादी कार्यकर्ते उपस्तित होते