औरंगाबाद जिल्हास्तरीय विद्युतीकरणाची बैठक औरंगाबाद – जिल्हास्तरीय विद्युतीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (ता.२७) मुख्य अभियंता विद्युत वितरण यांच्या कार्यालयात, मिल कॉर्नर येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हयातील विद्युतीकरण व त्यांचे विस्तारीकरण या बाबत सर्वांचा समन्वय साधून प्रगती बाबत आढावा घेण्यात येणार आहे. नागरिकांच्या विद्युतीकरणासंबंधी तक्रारी असल्यास त्यांनी बैठकीस निवेदनही/अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकिला महापालीका,जी.टी.एल, महावितरण आदीचे अधिकारीवर्ग तसेच सदस्य उपस्थित राहणार आहे.