जालना शहराच्या मोती तलावात गणेश विसर्जन करताना तीन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू नाते वाईकाचा नगर पालिकेच्या समोर ठिय्या अंदोलन. उपनगराध्यक्षांच्या आश्वासना नंतर अंदोलन मागे. एल कुरेशी जालना प्रतिनिधी/ दि.23 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन करताना तीन युवकाचाअमोल रनमुले,निहाल चौधरी, शेखर भदनेकर,यांचा मोती तलावात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी दोन मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह जालना पालिकेत आणल्याने तनाव मोठया प्रमाणात वाढला होता. मोती तलावात गणेश विसर्जन करताना तीन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी शहरात पसरताच या बाबतीत माहिती घेण्यासाठी लोक मोती तलावाकडे धावपळ करत येत होते. व सर्वत्र चर्चा सुरू झाली होती की. गणेश विसर्जनच्या ठिकाणी पालिकेने पाहिजे तेवढी दक्षता घेतली नाही म्हणून ही घटना घडली. मृतांच्या नातेवाईकांनी प्रारंभी सकाळी जिल्हा रुग्णालयात मृताचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. परंतू नंतर मृतदेह शववाहिनीतून जालना पालिकेत आणले गेले. त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर लोक जमा झाले उपनगराध्यक्ष राजेश राऊत, यावेळी तेथे पोहोचले व त्यांच्या सह इतर लोकांनी या लोकांना समजावून सांगितले, मुख्याधिकारी खांडेकरवर देखील संतप्त नातेवाईकांनी प्रश्नांचा भडीमार केला, व त्यांना या घटनेला बद्दल जाब विचारला, यामुळे या परिसरात तणाव वाढत होता, परंतू पोलीस प्रशासन दक्ष असल्याने काहीही अनुचित घटना घडली नाहीं, राजेश राऊत आणी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे अथवा पालिकेच्या नौकरीत घेण्यात येईल असे अश्वासन दिले, व या साठी लवकरच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा ठेऊन मान्यता घेतली जाईल असे अश्वासन देत लेखी पत्र दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना दिल्याने, दोन तास चाललेला हा अंदोलन मागे घेतल्या नंतर सोमवारी दुपारच्या नंतर निहाल चौधरी व शेखर भदनेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.