युवक काँगे्रसच्या उपाध्यक्षपदी शेषराव जधव जालना, प्रतिनिधी ः जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शेषराव धोंडीराम जाधव हे निवडून आले आहे. शेषराव जाधव हे सर्वसामान्य कुटूबातील कुठलाही राजकीय वारसा नसलेले कार्यकर्ते असून या आधी युवक काँग्रस विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. या विजया बद्दल माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, मा. आ. कैलास गोरंट्याल, कुनाल राऊत, आजित सिंग, राजेश लाडे, शेख मंहमद, रफान सिद्धीकी आदींसह मित्र परिवाने त्यांचे अभिनंदन व स्वागत केले.