अखिल भारतीय वंजारी विकास महासंघाचे वार्षिक अधिवेशन आळंदी-श्री यल्लम रेड्डी धरमशाला ,आळंदी चौक, आळंदी येथे दिनांक 30 । 09 । 2018 रोजी सकाळी आयोजित केले आहे. वंजारी समाजाला वाढवून आरक्षण मिळाले पाहिजे या एकाच विषयावर कायदे विषयक अभ्यासू मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे,तसेच आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे त्याला जोडून खुले अधिवेशन होईल,संघटना बांधणीवर चर्चा होईल,पुढील तीन वर्षासाठी पदाधिकारी निवड होईल,ज्यांना निःस्वार्थ समाज सेवा करावयाची आवड आहे,त्यांना संधी दिली जाईल समाजाचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा होईल महाराष्टात एक कोटी वीस समाज आहे परंतु ते जाणवायला पाहिजे त्यासाठी सर्व चार शाखेतील समाज एकसंघ करण्याची व,,,सकल वंजारी समाज,,,करण्याची गरज आहे यावर नियोजन करण्यात येईल,नोकर भरतीत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहेत सेवेत असणारे अधिकारी,कर्मचारी यांचेवर अन्याय होत आहे,ऊस तोड मजूर म्हणून वंजारी समाजाची ओळख होत आहे,ऊस मजुरांच्या कुटुंबावर अन्याय होत आहे विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक सवलत मिळत नाही, ग्रामीण भागात रोज मजुरी केल्याशिवाय घरी चूल पेटंत नाही गरिबीमुळे समाजाची मुल, मुली उपवर होत चालली आहेत,लग्न होत नाही,समाज कठीण परिस्थितीतून संकटांचा सामना करीत आहे,मार्ग सापडत नाही यावर एकच मार्ग आहे वंजारी समाज एकसंघ झाला पाहिजे अन्याया विरुद्ध लढाई केली पाहिजे, तर सर्वांनी सकल वंजारी समाजाने एकत्र येऊन,समाज बांधव व भगिनींनी मोट्या संख्येने अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री रामरावजी लव्हारे राष्ट्रीय अध्यक्ष वंजारी विकास महासंघ , श्री यमना जी आघाव राष्ट्रीय उपाध्यक्ष।