श्वानांकरीता मोफत रेबीज प्रतिबंध लसीकरण शिबीर औरंगाबाद,– जागतिक रेबीज दिनानिमित्त अग्रणी लस निर्मिती संस्था झोएटीस, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय, औरंगाबाद, कामधेनु पशु औषधालय, औरंगाबाद श्री. फार्मा, डुलस पेडिग्री, वेटोक्वीनॉल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत श्वानांसाठी मोफत श्वानदंश रोगप्रतिबंधक (रेबीज) लसीकरण शिबीर पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय, खडकेश्वर औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. श्वान रेबीज लसीकरणासाठी पुर्व नोंदणी व चौकशी करीता , डॉ. आश्रृबा गाडवे- 9860885427, डॉ. भाऊसाहेब थोरात – 94203193 68 यांच्याशी संपर्क साधावा. तरी सर्व श्वान मालकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे, आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय , औरंगाबाद यांनी केले आहे.