औरंगाबाद-ग्रामीण भागातील विनोद बागुल यांची इद्रा चित्रपटात यशस्वी झेप /बदनापुर/औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासुर गावामध्ये जन्म घेतलेला एका गरीब कुटुंबातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेला विनोद बागुलची आपली कला जिवंत ठेवण्यासाठी मुंबईत धडपड सुरू होती. 1999 साली त्याने कारगील युद्धातील शहीद जवानांसाठी एक शाम शहीदोके नाम कार्यक्रमातून देशसेवेसाठी भरीव निधी विनोद बागुलने जमा करून दिला होता.पालघर जिल्ह्यात रोजी रोटीसाठी स्थिरावलेल्या विनोदने सामाजिक भान जपताना डहाणू, वाणगाव,धिवली,दांडी,उच्चेदी,चिलहरफाटा आदी आदिवासी पाडयात विविध सण उत्सवातून समाज प्रोबोधनाचा जागर सुरू ठेवला होता आज तो यशस्वी झाला.गावात एकीकडे कोरभर भाकर आणि पसाभर दाण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाही आपला भाउ कला क्षेत्रात काहीतरी करतोय एवढाच आनन्द विनोदच्या तीन बहिणी,मोठा भाउ यांना वाटते.विनोद अगदी आठवीत असताना विविध प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढण्यात तरबेज होता.विनोदकडे कलेचा कोणताच वारसा नाही.लहानपणी टीव्ही व कॅसेटमधूनच ऐकलेले,टीव्हीवर पाहिलेल्या कलाकाराची अदाकारी हेच त्याच्यासाठी आज खरे मार्गदर्शक ठरलेलेले आहे. आणि बागुल यांच्या यशाचं रहस्य म्हणजे येत्या 28 सप्टेंबरला एस आर फिल्म प्रस्तुत निर्देशक रमेश थोरात यांचा इद्रा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटामध्ये गंगापूर तालुक्यातील लासुर येथील एका गरीब घरान्यायातला मुलगा सिनेअभीनेते विनोद बागुलसर यांनी इद्रा चित्रपटात मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारलेली आहे,आणि चित्रपटात गायक आनन्द शिंदे,गायिका वैशाली माडे यांच्या मधुर आवाजातील गाण्याची झलक ऐकायला मिळणार आहे. सम्पूर्ण गंगापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे की,आपल्याच ग्रामीण भागातील विनोद बागुल सिनेअभिनेतेच्या रुपात बघायला मिळतील आणि नक्कीच हा चित्रपट यशस्वी होईल असा गंगापूर वासीयांमध्ये विश्वास व्यक्त करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे गंगापूर येथील प्रसिद्ध लेखक व यांची पुस्तके अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर देखील उपलब्ध करनारे योगेश तू.मोरे यांनी लिहिलेल्या "भरकटलेल्या पक्ष्याचा किलबिलाट" या कादंबरीवर विनोद बागुल सर सिनेअभीनेते लवकरच मराठी चित्रपट बनवणार असून या चित्रपटात विनोद बागुल सर स्वतः निर्माता म्हणून तसेच यामध्ये प्रमुख भूमिका विनोद बागुल व लेखक योगेश तू.मोरे,महेश मोरे ,स्वप्नील ठाकूर,गवळीशीवरा चे आदर्श शिक्षक विकास शिंदे सर,आब्बोट इंटरनॅशनल चे दादासाहेब जाधव,सेलूच्या जिल्हा परिषद शिक्षिका भाग्यश्री मोरे,शेख यकीन यांची असणार आहे.आणि यामध्ये ग्रामीण भागातील कलाकारांचा समावेश होणार आहे आणि या चित्रपटाला नक्कीच तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास विनोद बागुल यांनी व्यक्त केला.