मतदार यादी व मतदानयंत्राबाबत जनजागृती अभियान निवडणूक शाखा राबवतेय विविध उपक्रम जालना- जिल्‍हा निवडणूक विभागाची आगामी लोकसभा निवडणूक पूर्वतयारीचे दृष्‍टीने मतदार यादी , मतदार नोंदणी, व मतदान यंत्राबाबत जनजागृती जोरात सुरु असून यासाठी गणेश उत्‍सवाचाही आधार घेण्‍यात आला आहे.शहरातील गणेश उत्‍सव देखावे पाहणेसाठी अनेक गणेशभक्‍त येत असतात या गणेश भक्‍तांना सहज दिसतील अशा पध्‍दतीने जनजागृती करणा-या बॅनर निवडणूक शाखेने लावले आहेत.२०१९ मध्‍ये होणा-या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हयात लोकशाही,निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादी अद्यावत करणेसाठी जिल्‍हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्‍या कल्‍पकते मधून व उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी श्रीमती संगीता सानप यांच्‍या मार्गदर्शनाखाली नवनवीन संकल्‍पना राबविल्‍या जात आहेत.यात जिल्‍हयातील बसस्‍थानकावर ध्‍वनीचित्रफीत, जिल्‍हा व तालूकास्‍तरावरील कार्यालय,शहरातील जास्‍त गर्दीचे ठिकाणी चौकात, नामांकित गणेश मंडळाचे ठिकाणी निवडणूक विभागाचे प्रचार व प्रसिध्‍दीचे बॅनर लावण्‍यात येवून जनजागृती करण्‍यात येत आहे.सध्‍या गणेशोत्‍सव सुरु असल्‍याने या उत्‍सवात सार्वजनिक गणेश मंडळाकडून सादर करण्‍यात येणारे देखावे पाहण्‍यासाठी येणा-या गणेश भक्‍तांमध्‍ये सुध्‍दा मतदार नोंदणी,मतदान कार्डवर रंगीत फोटो,नांव वगळणी,दूरुस्‍ती इ बाबत जनजागृती करण्‍यासाठी विविध उपक्रम राबविण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.त्‍याचबरोबर दिनांक १७ सप्‍टेंबर २०१८ रोजी मराठवाडा मुक्‍ती संग्रामदिनाचे औचित्‍य साधून शाळास महाविद्यालयातून निघणा-या प्रभात फेरी मध्‍ये विद्यार्थ्‍याकडून मतदार नोंदणी बाबत जनजागृती करण्‍यात आली त्‍यात एम.जी.नाथानी विद्यालय, दानकुंवर महिला विद्यालय,महाराष्‍ट्र हायस्‍कूल, एम.एस.जैन विद्यालय,सी.टी.एम.के.विद्यालय,राष्‍ट्रीय हिंदी विद्यालय या विद्यालयांनी सहभाग नोंदविला.तत्‍पूर्वी गुरु गणेश दृष्‍टीहीन विद्यालयात दिनांक २३ ऑगस्‍ट २०१८ रोजी दिव्‍यांग मतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते.