आप’ चे महाराष्ट्र प्रभारी श्री दुर्गेश पाठक यांचा महाराष्ट्र कार्यकर्त्यांशी संवाद मुंबई : रोजी शिवाजी मंदिर दादर येथे दिवसभर चाल्लेल्या कार्यकर्ता संवाद मध्ये ‘आप’ चे महाराष्ट्र प्रभारी श्री दुर्गेश पाठक यांनी उपस्थित सर्व प्रमुख जिल्हा प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी मनसोक्त चर्चा आणि विचार विमर्श केला. यात दिल्ली सरकारच्या शिक्षण आणि आरोग्य सेवा शेत्रात अमुल्यागृह बदल, देशातील माहागाई, बेरोजगारी, बिकट आर्थिक प्रश्न, क्षेत्रीय विकासा आभव, जातीय आणि धार्मिक कटुता, आशा विविध समस्यांवर आम आदमी पार्टीचा दृष्टीकोन व निराकरण करण्याची बळकट शमता आणि इच्छा शक्ती, तसेच या शेत्रात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे साकारात्म्क काम देशासाठी कशा प्रकारे महत्वाचे ठरतो हे सांगण्यात आले. सदर चर्चेमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र सह संयोजक श्री रंग राचुरे, श्री धनंजय शिंदे, महाराष्ट्र (युवा) संयोजक श्री अजिंक्य शिंदे, राज्य सीमित सभासद अलीम पटेल अमरावती, सिद्धार्थ बनसोड, अशीर जयहिंद औरंगाबाद,जितेंद्र भावे नासिक, मुंबई सर्व विधानसभा समिती सदस्य, सर्व सभासद आदी उपस्थित होते.