औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील 16 स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन मंजुर मुंबई- हैद्राबाद मुक्ती संग्रामात लढा दिलेल्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न प्रलंबित होता. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी निवृत्तीवेतनासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 16 स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन मंजूर केल्याचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी एका पत्रान्वये कळविले आहे. या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील भाऊलाल लक्ष्मण पुरी, श्रीमती समिंद्राबाई आश्रुबा साळुंके, श्रीमती द्वारकाबाई पांडूरंग साळुंके, शेनफड रामा साळुंके, मोहनराव किसनराव चव्हाण, सदाशिव कडूबा तुपे, गणेशलाल मन्नुलाल परदेशी, सांडू देवराव उबाळे, मारोती भाऊ अधाने, लक्ष्मण राधाजी अधाने, कचरु रघुनाथ देशमुख, बद्रीनारायण देवलाल जैस्वाल, त्रिंबक लहानू शिरसाठ, पांडू बंडु लोखंडे, म्हाळसू बाळा तर जालना जिल्ह्यातील किसन शंकर बोचरे यांचा समावेश आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागून न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त करत सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी श्री लोणीकर यांचे आभार व्यक्त केले.