जालना जिल्ह्यात गट विमा सहकारी संस्था कृती समितीची स्थापना फकीरा वाघ यांची अध्यक्षपदी तर एस.एस. रुपदे यांची सचिव पदी निवड जालना (प्रतिनिधी) जालना येथे नुकतीच गट विकास सहकारी संस्था कृती समितीची स्थापना करण्यात आली असून सभासदांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्या सोडवणे तसेच सभासदांना संस्थेच्या प्रत्येक कामकाजाची माहीती व्हावी यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह जालना येथे एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यात महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत फकीरा वाघ यांची अध्यक्षपदी तर एस.एस. रुपदे यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. व्याज माफ करणे, विकासकाने अपुर्ण घरांचे काम पुर्ण करुन देणे, रजिस्ट्री करुन देणे, रस्ते व पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था करुन देणे, अनेक सभासदांना संस्थेचे ठिकाण माहीती नसने, आपले घर कोणत्या संस्थेत आहे हे माहीती नसने, संस्थेचे अध्यक्ष माहीती नसने, काही सभासदांना घरे ताब्यात मिळाल्याबाबत सांगण्यात आले परंतु ती घरांचे अपुर्ण बांधकाम झालेले आहे तर काही जनांनी घरे ज्या स्थीतीत आहेत त्या स्थीतीत ताब्यात घेवून वरील बांधकाम स्व खर्चाने केले, काही घरे बेसीमेंन्ट लेवल, काही लेंन्टल, स्लॅब टाकलेल्या अवस्थेत आहे. घराचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. भिंतीचे बांधकाम अत्यंत मोडकळीस आलेले आहे. घरे अपुर्ण व निकृष्ठ दर्जाचे असतांनाही विकासकाचा वाढीव 40 टक्के रक्कम देण्यासाठी सभासदाकडे तगादा आहे. वरील परिस्थीती असतांना देखील शासनाने बील्डरला संपुर्ण रक्कम अदा केलेली आहे. पहीला हप्ता अदा केल्यानंतर दुसरा हप्ता अदा करण्याआधी लेखा परिक्षण करणे व तीसरा हप्ता अदा करण्यापुर्वी लेखा परिक्षण व वास्तु विशारदाचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र व सभासद कर्मचार्‍यांचे संमती पत्र घेेणे आवश्यक होते, परंतु तसे न करता शासनाने विकासकास सर्व रक्कम अदा केली आहे. कर्मचारी सेवा निवृत्त होत असतांना ना देय प्रमाणपत्राशिवाय सेवानिवृत्ती मिळत नाही. ना देय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कर्मचार्‍यांना मिळणारा पैसा संपुर्ण पणे घराच्या मुद्दल व व्याजामध्ये कपात केला जात आहे. सेवा निवृती वेतन सुरु होते, परंतु पैसा मिळत नाही. अशा व्यथा अनेक कर्मचार्‍यांनी मांडल्या. गट विमा गृह निर्माण संस्थेचे घेरे बांधून मिळावे, घरांचा ताबा मिळावा, रजिस्ट्री करुन मिळावी, व्याज माफ करावे, या न्याय हक्कासाठी गट विमा गृह निर्माण संस्था कृती समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीत फकीरा वाघ यांची अध्यक्षपदी तर एस.एस. रुपदे यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. दि. 1 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा उप निबंधक यांना निवेदन देण्यात येणार आहे. गट विमा गृह निर्माण संस्थेच्या बाबतीत जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येणार आहे. या बैठकीस शामराव जाधव, श्रीकांत रुपदे, रतन दळवी, गजाजन निकम, विलास खरात, देविदास काळे, एस.बी. राव, रामेश्वर मोरे, सुनिल महेश्वर, कृष्णा तांगडे, उल्हास लत्ताड, सज्जन अहिरे, गणपत कांबळे, बी.ई. पठाण, अशोक जाधव, ए. यु. खरात, श्रीमती आर. व्ही. साळवे, श्रीमती सी.पी. चौधरी, सौ. रजनी गायकवाड, धांडे यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती.