किया सेल्‍टोसच्‍या वर्ल्‍ड प्रीमिअरचे आयोजन India, 2019: किया मोटर्स या जगातील ८व्‍या सर्वात मोठ्या ऑटो उत्‍पादक कंपनीने भारतासाठी त्‍यांची पहिली कार 'किया सेल्‍टोस'च्‍या वर्ल्‍ड प्रीमिअरचे आयोजन केले. स्‍वदेशात उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या सेल्‍टोसमध्‍ये समकालीन व स्‍टाइलिश डिझाइन आणि आकर्षक व एैसपैस जागा असलेले इंटेरिअर्स आहे. वेईकलमध्‍ये जागतिक, भारतीय व विभागातील पहिलीच दर्जात्‍मक सुरक्षा वैशिष्‍ट्ये आहेत. ज्‍यामुळे वेईकलमध्‍ये विभागामध्‍ये नावलौकिक करण्‍याची क्षमता आहे. किया सेल्‍टोसमध्‍ये उच्‍च कार्यक्षमता व शक्तिशाली कामगिरीसाठी विकसित करण्‍यात आलेले थर्ड-जनरेशन पॉवरट्रेन 'स्‍मार्टस्‍ट्रीम' आहे. मूळत: भारतासाठी उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या या वेईकलमध्‍ये जागतिक दर्जाची डिझाइन, दर्जा व वैशिष्‍ट्ये आहेत. आता ही वेईकल २०१९च्‍या चौथ्‍या तिमाहीमध्‍ये जागतिक बाजारपेठांमध्‍ये देखील उपलब्‍ध असेल.याप्रसंगी बोलताना किया मोटर्स कॉर्पोरेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व अध्‍यक्ष श्री. हॅन वू पार्क म्‍हणाले, ''भारत ही किया मोटर्सच्‍या एकूण विकासगाथेसाठी महत्‍त्‍वाची बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ आमची जागतिक उपस्थिती वाढवण्‍यामध्‍ये महत्‍त्‍वाची भूमिका बजावेल. भारत हा देशभरात वैशिष्‍ट्यपूर्ण ड्रायव्हिंग स्थिती असलेला वैविध्‍यपूर्ण देश आहे. म्‍हणूनच प्रत्‍येक बाजूने परिपूर्ण असलेली वेईकल सादर करणे महत्‍त्‍वाचे होते. आम्‍हाला भारतीय ग्राहक व त्‍यांच्‍या गरजा लक्षात घेत उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या किया सेल्‍टोससह भारतातील प्रवास सुरू करण्‍यास आनंद होत आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, सेल्‍टोस आगामी वर्षांमध्‍ये कियाला भारताची प्रख्‍यात ऑटोमोबाइल कंपनी बनवण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. जाग‍तिक स्‍तरावर सेल्‍टोसचे वर्ल्‍ड प्रीमिअर हा कियासाठी महत्‍त्‍वाचा मैलाचा दगड आहे. यामधून भारतीय बाजारपेठेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ही फक्‍त सुरूवात आहे. आमच्‍याकडे जगातील ४थ्‍या सर्वात मोठ्या ऑटो बाजारपेठेसाठी अनेक सरप्राईजेज आहेत.''