मुरारीचा पंचमला दत्‍तक घेण्‍याचा निर्णय 'हास्‍याविना दिवस हा व्‍यर्थ दिवस' या जुन्‍या म्‍हणीच्‍या आधारावर सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है' प्रेक्षकांना आपल्‍या रोमांचक व मंत्रमुग्‍ध पटकथांसह हसवून हसवून लोटपोट करत आहे.आगामी एपिसोड्समध्‍ये एक रहस्‍यमय महिला घराच्‍या तावरुन इलायचीच्‍या खोलीमध्‍ये येते आणि तिचे केस कापते. मुरारी (अनुप उपाध्‍याय) व करुणा (सोमा राठोड) यांना इलायचीच्‍या (हिबा नवाब) या स्थितीबाबत काळजी वाटते. छोटे त्‍यांना सल्‍ला देतो की, मुरारीने एखाद्याला दत्‍तक घेतले पाहिजे, ज्‍यामुळे मुरारी ईलायचीजवळ नसताना ती व्‍यक्‍ती तिची काळजी घेऊ शकेल. पंचम (निखिल खुराणा) एका चोराला चोरी करून पळताना पकडतो. मुरारी व करुणाला त्‍यांच्‍या मुलीची काळजी घेण्‍यासाठी तोच योग्‍य व्‍यक्‍ती वाटते आणि म्‍हणूनच ते त्‍याला दत्‍तक घेण्‍याचा निर्णय घेतात. पंचम दत्‍तक कागदपत्रांवर स्‍वाक्षरी करेल का? इलायची या स्थितीला कशाप्रकारे सामोरे जाईल? मुरारीची भूमिका साकारणारा अनुप उपाध्‍याय म्‍हणाला, ''आमची मालिका 'जिजाजी छत पर है'ला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत असल्‍याचे पाहून खूप आनंद होत आहे. यामधून आम्‍हाला हास्‍याचा स्‍तर अधिक उंचावत प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्‍यास प्रेरणा मिळते. वडिलांसाठी मुली या जीव की प्राण असतात. मला खात्री आहे की, पालक आगामी एपिसोड्सशी जुडले जातील.''