किर्लोस्कर हायस्कूल ने सलग १८ व्या वर्षी महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मिळवला १०० % निकाल किर्लोस्करवाडी, १९ जून २०१९ : किर्लोस्कर हायस्कूल ने नवीन विक्रम स्थापन करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ (एमएसबीएसएचई) तर्फे १ – २२ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेल्या राज्य माध्यमिक प्रमाणपत्र (एसएससी) किंवा दहावीच्या परिक्षेत १००% निकाल प्राप्त केला आहे. महाराष्ट्र बोर्डातील कोल्हापूर विभागात शाळेने सलग १८ व्या वर्षी हे लक्ष्य साध्य केले आहे. शाळेने या वर्षी गाठलेले हे लक्ष्य म्हणजे उल्लेखनीय आहे कारण या वर्षी एसएएसीचा या वर्षीचा निकाल राज्यात कमी प्रमाणात लागला आहे. किर्लोस्कर हायस्कूल मधून या वर्षी ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांत २७ मुली व २० मुलांचा समावेश आहे. यांतील २५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळवले असून १६ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवत (७५ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान) तर ६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६०% ते ७५%) गूण मिळवले. मुलींनी यावर्षीही बाजी मारली असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय सोडून सर्व विषयांत आघाडी मिळवली आहे. या निकाला विषयी बोलतांना किर्लोस्कर हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री के.हरिंद्रनाथन यांनी सांगितले, “किर्लोस्कर हायस्कूल ने पुन्हा एकदा माध्यमिक शालांत परिक्षेत उत्कृष्ट काम केले असून १००%निकाल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षी पध्दतीत केलेल्या बदलामुळे ही कार्यक्षमता वाढली असून यांतून असे दिसून येते की शाळा नवीन गोष्टी सहज स्विकारत असून प्रसंगानुरूप काम करत आहे. हे मोठे लक्ष्य आम्ही शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमुळे पूर्ण करू शकलो.” शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यां मध्ये शुभदा अतुल गावडे हिने ९८.20% गुण मिळवून शाळेत पहिली तर मिहिका सचिन सावंत हिने ९८% गुण मिळवून दुसरा तर वैष्णवी उत्तम हिरवडेकर हिने ९७.८०% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. विषयवार प्रथम क्रमांक : इंग्रजी (९२%) शुभदा अतुल गावडे, हिंदी-संस्कृत (९८%) श्रृती संतोष कुलकर्णी, मिहिका सचिन सावंत, स्वरांजली श्रीकांत चव्हाण, मैत्रेयी मिलिंद जोशी, मराठी (९३%) - श्रृती संतोष कुलकर्णी, मिहिका सचिन सावंत, गणित (९९%)- शुभदा अतुल गावडे, वैष्णवी उत्तम हिरवडेकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान (९८%), शुभदा अतुल गावडे, अथर्व अजित पाटील आणि सामाजिक शास्त्र (९९%) वैष्णवी उत्तम हिरवडेकर. ‍‍किर्लोस्कर हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून तिची स्थापना १९३६ मध्ये कै. श्री लक्षृमणवराव किर्लोस्करांनी केली. विद्यार्थ्यांचा समग्र विकास करणारी शाळा म्हणून शाळेचे नाव आहे त्याच बरोबर सुरक्षित, सुयोग्य असे वातावरण असल्याने शाळेत प्रवेश घेण्याची उत्सुकता मुलांमध्ये नेहमी असते. शाळेचे व्यावसायिक पध्दतीने व्यवस्थापन केले जात असून हे व्यवस्थापन श्रीमती प्रतिमा किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखाली विकास चॅरिटेबल ट्रस्ट कडून केले जाते. श्रीमती प्रतिमा किर्लोस्कर शाळेच्या वाढी आणि विकासावर नेहमीच लक्ष ठेऊन असतात. सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ट्रस्ट ने यूके मधील केंब्रिज एज्युकेशन पार्टनरशिप लिमिटेड बरोबर सहकार्य करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हे यूकेच्या गुणवत्तेनुसार देण्यावर जोर दिला आहे. शाळेतर्फे सातत्याने मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांबरोबर सेवा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते. किर्लोस्कर हायस्कूल ने सलग १८ व्या वर्षी महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मिळवला १०० % निकाल किर्लोस्करवाडी, १९ जून २०१९ : किर्लोस्कर हायस्कूल ने नवीन विक्रम स्थापन करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ (एमएसबीएसएचई) तर्फे १ – २२ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेल्या राज्य माध्यमिक प्रमाणपत्र (एसएससी) किंवा दहावीच्या परिक्षेत १००% निकाल प्राप्त केला आहे. महाराष्ट्र बोर्डातील कोल्हापूर विभागात शाळेने सलग १८ व्या वर्षी हे लक्ष्य साध्य केले आहे. शाळेने या वर्षी गाठलेले हे लक्ष्य म्हणजे उल्लेखनीय आहे कारण या वर्षी एसएएसीचा या वर्षीचा निकाल राज्यात कमी प्रमाणात लागला आहे. किर्लोस्कर हायस्कूल मधून या वर्षी ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांत २७ मुली व २० मुलांचा समावेश आहे. यांतील २५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळवले असून १६ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवत (७५ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान) तर ६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६०% ते ७५%) गूण मिळवले. मुलींनी यावर्षीही बाजी मारली असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय सोडून सर्व विषयांत आघाडी मिळवली आहे. या निकाला विषयी बोलतांना किर्लोस्कर हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री के.हरिंद्रनाथन यांनी सांगितले, “किर्लोस्कर हायस्कूल ने पुन्हा एकदा माध्यमिक शालांत परिक्षेत उत्कृष्ट काम केले असून १००%निकाल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षी पध्दतीत केलेल्या बदलामुळे ही कार्यक्षमता वाढली असून यांतून असे दिसून येते की शाळा नवीन गोष्टी सहज स्विकारत असून प्रसंगानुरूप काम करत आहे. हे मोठे लक्ष्य आम्ही शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमुळे पूर्ण करू शकलो.” शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यां मध्ये शुभदा अतुल गावडे हिने ९८.20% गुण मिळवून शाळेत पहिली तर मिहिका सचिन सावंत हिने ९८% गुण मिळवून दुसरा तर वैष्णवी उत्तम हिरवडेकर हिने ९७.८०% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. विषयवार प्रथम क्रमांक : इंग्रजी (९२%) शुभदा अतुल गावडे, हिंदी-संस्कृत (९८%) श्रृती संतोष कुलकर्णी, मिहिका सचिन सावंत, स्वरांजली श्रीकांत चव्हाण, मैत्रेयी मिलिंद जोशी, मराठी (९३%) - श्रृती संतोष कुलकर्णी, मिहिका सचिन सावंत, गणित (९९%)- शुभदा अतुल गावडे, वैष्णवी उत्तम हिरवडेकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान (९८%), शुभदा अतुल गावडे, अथर्व अजित पाटील आणि सामाजिक शास्त्र (९९%) वैष्णवी उत्तम हिरवडेकर. ‍‍किर्लोस्कर हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून तिची स्थापना १९३६ मध्ये कै. श्री लक्षृमणवराव किर्लोस्करांनी केली. विद्यार्थ्यांचा समग्र विकास करणारी शाळा म्हणून शाळेचे नाव आहे त्याच बरोबर सुरक्षित, सुयोग्य असे वातावरण असल्याने शाळेत प्रवेश घेण्याची उत्सुकता मुलांमध्ये नेहमी असते. शाळेचे व्यावसायिक पध्दतीने व्यवस्थापन केले जात असून हे व्यवस्थापन श्रीमती प्रतिमा किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखाली विकास चॅरिटेबल ट्रस्ट कडून केले जाते. श्रीमती प्रतिमा किर्लोस्कर शाळेच्या वाढी आणि विकासावर नेहमीच लक्ष ठेऊन असतात. सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ट्रस्ट ने यूके मधील केंब्रिज एज्युकेशन पार्टनरशिप लिमिटेड बरोबर सहकार्य करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हे यूकेच्या गुणवत्तेनुसार देण्यावर जोर दिला आहे. शाळेतर्फे सातत्याने मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांबरोबर सेवा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते.