हिमालय ड़्रग कंपनी आणि नाम फाऊन्डेशन ने केला महाराष्ट्रात कंत्राटी शेतीसाठी सहकार्य करार शाश्वत विकास आणि शेतकर्‍यांमध्ये योग्य कृषी पध्दती रूजवण्यावर लक्ष केंद्रित करणार औरंगाबाद, १९ जून २०१९- हिमालय ड्रग कंपनी या भारतातील आघाडीच्या वेलनेस कंपनी ने आज नाम फाऊन्डेशन या शेतकर्‍यांना कंत्राटी पध्दतीने शेती करण्यास व सहकार्य करणार्‍या सामाजिक संस्थेबरोबर सहकार्य करार केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिमालय तर्फे सीड टू शेल्फ योजना अंमलात आणण्यात येणार असून पर्यावरणाशी सुसंगत अशा योजना राबवण्यात येणार आहेत. छोट्या शेतकर्‍यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या आपल्या उद्दिष्ट्याचा एक भाग म्हणून हिमालय तर्फे शेतकर्‍यां बरोबर कंत्राट करून वनौषधींचे उत्पादन घेतले जाणार आहे. “ शेतकर्‍यांना कंत्राटी शेती सोपी व्हावी व लाभप्रद व्हावी यासाठी आम्ही या उपक्रमा अंतर्गत आमच्या वनौशधींची खरेदी वाढवली आहे. हिमालय मधील ॲग्रोटेक टिम ही माती आणि पाण्याचे परिक्षण हे पेरणीपूर्वी करते आणि संपूर्ण कार्यक्रमावर लक्ष ठेवते. शेतकर्‍यांना देण्यात येणारी बियाणे ही अगदी मोफत देण्यात येतात आणि त्याच बरोबर कंत्राटाच्या किंमती नुसार आलेल्या पिकाला किंमत देण्यात येते. म्हणजेच शेतकर्‍यांना कोणती किंमत मिळणार हे माहित असते जेणेकरून ते बाजारपेठेतील किंमतीच्या चढऊतारां पासून चिंतामुक्त होतात.” असे हिमालय ड्रग कंपनी चे डॉ. यू व्ही बाबू यांनी सांगितले. हे सहकार्य करतांना नाम फाऊन्डेशन हे या शेतकर्‍यांच्या वतीने कंत्राट करणार असून महाराष्ट्रातील कंत्राटी शेतीचे परिचालन संस्थे तर्फे करण्यात येणार आहे. नाम फाऊन्डेशन तर्फे हिमालय ला वनौषधींची शेती करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. “नाम फाऊन्डेशन ला हिमालय बरोबर भागिदारी करतांना आनंद होत असून महाराष्ट्रातील विशेष करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांना याचा मोठा लाभ होणार आहे. आम्ही रोजच्या कामकाजावर लक्ष ठेऊन आहोत आणि हिमालय तर्फे देण्यात येणार्‍या तंत्रज्ञानातील सहकार्यावरही लक्ष ठेऊन आहोत. शेतकर्‍यांना ठरवलेली मालाची किंमत मिळेल आणि त्यामुळे त्यांना बाजारात जाण्याची गरज नाही तसेच बियाणे खरेदी करण्याचीही गरज नाही. हिमालय ने शेतकर्‍यांना हे पिक कसे घ्यावे लागवड कशी करावी, देखभाल कशी करावी या विषयीही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे त्यांना मोठा लाभ होणार आहे.” असे नाम फाऊन्डेशन चे संस्थापक आणि प्रसिध्द मराठी चित्रपट कलाकार श्री मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. कंत्राटी शेतीचा हा कार्यकम दोघांसाठी लाभदायक असून यामुळे शेतकर्‍यांना स्थीर उत्पन्न मिळण्याची हमी मिळते तसेच हिमालय ला वनौषधींच्या नियमित उपलब्धतेची ही हमी मिळते.