परतुर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह नवीन नांदेड मुंबई एक्सप्रेस गाडी सुरू करणे बाबत परतूर म.रा.मराठी.पत्रकार संघाच्या वतीने, खासदार संजय जाधव यांना निवेदन सादर. एम एल कुरेशी परतूर. परतूरः परभणी लोकसभा मतदारसंघांतून दुसर्यंदा निवडून आलेले खासदार, संजय (उर्फ बंडू) जाधव, यांनी आज परतुर शहराला भेट दिली, लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याबद्दल येथे आज त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,या प्रसंगी परतूर म. रा.मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय जाधव यांना रेल्वे गाड्यांच्या थांब्या विषयी, व नवीन नांदेड- मुंबई, रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले,निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, परतुर रेल्वे स्थानक, परतुर तालुक्यासह, मंठा तालुका, व घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण, व शहरी भागातील नागरिकांना रेल्वे सेवेचा लाभ मिळतो, इतर रेल्वे स्टेशनच्या तुलनेत, परतुर रेल्वे स्थानकाचा महसूल अधिक असताना, अपुऱ्या रेल्वेमुळे गैरसोय होत आहे, परतूर स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, रेल्वेचे जनरल डबे वाढविण्यात यावे, व स्टेशनवर नागरी सुविधा वाढवाव्यात हे प्रमुख मागण्याआहे. परतुर रेल्वे स्थानकावर लूज टाईम असलेल्या रेल्वे गाड्या, 1) काजीपेट- लोकमान्य तिलक विकली एक्सप्रेस, 02) ताडोबा विकली एक्स्प्रेस, 03) धनबाद - कोल्हापूर एक्सप्रेस, नगरसोल- नरसापुर डेली एक्सप्रेस, सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस, या गाड्यांना परतुर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, तसेच नगरसोल ते जालना डेमो रेल्वे परभणी पर्यंत करण्यात यावी, तसेच जनशताब्दी एक्सप्रेस परभणी पर्यंत करण्यात यावी व परतूर येथे थांबा देण्यात यावा, रेल्वेगाड्या तील गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने नांदेड ते मुंबई नवीन एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, परतुर रेल्वे स्थानकावरील वर्दळ व महसूल पाहता! या स्थानकावर असलेल्या रेल्वे गाड्या या गर्दीनुसार अपुऱ्या पडत आहेत, लग्नसराईच्या काळात खचाखच भरणाऱ्या डब्यामध्ये अक्षरशहा लटकून जातात, ही परिस्थिती पाहता परतुर रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा,सध्या दक्षिण मध्य रेल्वे मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या गाड्या (01) गाडी नंबर 11045 व 11046 धनबाद- कोल्हापूर एक्सप्रेस, या रेल्वे एक्सप्रेस गाडीला लूज टाईम आहे, या रेल्वेने पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे व दुसरीकडे तीर्थक्षेत्र बौद्ध गया बिहार पर्यंत प्रवास करणाऱ्यांना ही गाडी सोयीस्कर आहे, सदरील साप्ताहिक गाडी धनबाद हून येताना,परतूरला सकाळी 06:48 स्थानकावरून पास होते, तर कोल्हापूरहून येताना सकाळी 11:06 वाजता, परतुर स्थानकावरून पास होते, सदरील गाडीची वेळ पाहता औरंगाबाद-जालना हून येताना तपोवन एक्सप्रेस व मराठवाडा एक्सप्रेसला पर्याय म्हणून जास्त उपयोगी येऊ शकते, ( 02) तर काजीपेट- लोकमान्य तिलक, ही विकली ताडोबा एक्सप्रेस, परतूर हुन सकाळी 07: 28 ला पास करते, तर येताना रात्री 08:39 ला पास करते, ही गाडी परतूरच्या परवाशां करिता खूप सुविधाजनक आहे, नागपूर व चंद्रपूर भागाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या नंदिग्राम शिवाय सध्या कोणतीही पर्यायी गाडी नाही या गाडीने नवा पर्याय मिळेल, या गाड्या शक्यतो रिकाम्या धावतात, रात्री देवगिरी एक्सप्रेस नंतर मुंबईला जाण्याला, दुपारी 11:30 पर्यंत कोणतीही गाडी नाही, व सकाळी 7:30 ला ही गाडी चांगला पर्याय असेल, (03) नरसापुर - नगरसोल गाडी न.17213, 17 214, व 17 231, 17 232, डेली एक्सप्रेसला थांबा दिला तर ही फार सुविधाजनक राहील, सदरील गाडी नरसापुरला जाताना परतूर हून दुपारी 02:00 वाजता पास होते, औरंगाबाद- जालना हून येणाऱ्या प्रवाशांकरिता, शिर्डीहून नगरसोल मार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी फार सुविधाजनक आहे, तर नरसापुर- नगरसोल कडे जाताना ही गाडी पहाटे 04:30 वाजता परतूर हुन पास होते, सदरील गाडी शिर्डी औरंगाबाद जालना कडे जाणाऱ्यांसाठी योग्य वेळेवर आहे, (04) जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई जालना ऐवजी,, मुंबई -परभणी, करण्यात यावी, व परतूरला थांबा देण्यात यावा, नरसापुर- नगर नगरसोल-शिर्डी डेमो गाडी जालना परभणी पर्यंत करण्यात यावी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी व फूल उत्पादक शेतकऱ्यांना माल शहरापर्यंत पोहोचविण्यास मदत करेल, तसेच अप-डाऊन करणाऱ्यांना सुविधाजनक होईल, (05) नवीन एक्सप्रेस रेल्वे सुरू करावी, नांदेड- लोकमान्य तिलक मुंबई, यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन एक्सप्रेस नांदेडहुन दुपारी 03:00 वाजता सुरू करावी, यावेळी मुंबईकडे जाण्याच्या वेळेस गाडी नाही, सदरील गाडी परतूरला 05:00 ते 06:00 दरम्यान आल्यास नंदिग्राम एक्सप्रेस, या मध्ये नेहमीच असणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल, व प्रवाशांना सुविधाजनक होईल, सदरील गाडी नव्याने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, (06) सुविधा वाढवाव्यात, परतुर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग रूम उपलब्ध आहे मात्र विशेष सुविधा नाहीत, या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, स्थानकाजवळ रेल्वेची असलेल्या मोकळ्या जागेत, बसस्थानकाला जागा दिल्यास, प्रवाशांना अधिक सोयीचे होईल, रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लेटफॉर्म केलेले ओट्याचे बांधकाम लगेच खराब झालेले आहेत, अनेक ठिकाणी फरश्या उखडलेल्या आहेत, प्रवाशांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, (07) परतुर रेल्वे स्थानकावर मोटरसाइकिल व वाहने स्टॅन्ड प्रवाशांकडून अवाजवी करण्यात येणारी वसुली थांबवावी, (08) परतुर रेल्वे स्थानकावर स्थायी सफाई कर्मचारी नेमावे, स्थानिक लोकांना सफाई व शौचालय देण्यात प्राधान्य देण्यात यावे, सदरील निवेदना बाबत आपण आमच्या उपरोक्त महत्त्वपूर्ण मागण्यांचा विचार करून, आमच्या मागण्या मान्य कराव्यात, खासदार साहेबांनाअश्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे, निवेदनाच्या प्रती, 01)पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, 02) मा. जनरल सेक्रेटरी रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली. 03) मा. विभागीय व्यवस्थापक दमरे. नांदेड, 04) र्सव सन्मान्य पत्रकार व संपादक यांना देण्यात आले आहे