डॉ. कराड यांच्या वतिने पाटोदयाच्या स्वामी विवेकांनद शाळेला शालेय साहित्य प्रदान परतुर - प्रतिनिधी..प्रभाकर प्रधान गेल्या अनेक वर्षाच्या पंरपरेला तेवत ठेवत यावर्षीही येथील प्रसीध्द अस्तीरोग तज्ञ डॉ. संत्यानंद कराड यांनी तालुक्यातील पाटोदा येथील शाळेतील विदयाथ्र्यांना आज दि. 17 जुन 2019 रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या वतिने शालेय साहित्या प्रदान केले. यावेळी या शाळेचे अध्यक्ष सुरेश पाटोदकर व मुख्यध्यापक खवल यांनी सदरील शालेय साहित्य स्विकारत डॉ. कराड यांच्या या उपक्रमांचे ऋण व्यक्त केले. येथील सिटी दवाखान्यात आयोजीत या साहित्य वाटप कार्यक्रमात डॉ. कराड यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की, गरीब व होतकरू विदयाथ्र्याना शिक्षण घेतांना अनेक अडचणीचां सामना करावा लागतो, अशा विध्यार्थ्यांना मदत घ्यावी या हेतुन प्रतिवर्षी आपण हा उपक्रम राबवत आलो . या निमीत्ताने गरीब विदयाथ्र्याना या शालेय साहित्याच्या माध्यमातुन हि मोठी मदत ठरते. अनेकांना आपल्या बिकट आर्थीक परस्थीतीमुळे शिक्षण घेता येत नाही. अशावेळी इतर सामाजीक संघटनेंही पुढकार घेत, गरीब विध्यार्ध्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मुले शिकली तर समाजाची विस्कटेली घडी सुधारेल अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान यापुढेही गरजु विदयाथ्र्याच्या शालेय फिस बाबत आपली मदतीची भावना राहणार असुन गरीब व होतकरू विदयाथ्र्याना शिक्षण घेत असतांना आपण पाहिजेल ती मदत करू असे अभिवचन त्यांनी शेवटी दिले. Attachments area