सराटी येथील जि. प. प्रा. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप ; प्रवेश दिंडी - विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार कार्यक्रम संपन्न; सिल्लोड (प्रतिनिधी)दि 17 सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष संतोष लहाने, उपाध्यक्ष योगेश गुळवे, मुख्याध्यापक दुधभाते, शिक्षक राजपुत आदिंहस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रवेश दिंडी काढण्यात आली. तसेच पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ - शालेय पुस्तके देऊन टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष संतोष लहाने,उपाध्यक्ष योगेश गुळवे,मुख्याध्यापक दुधभाते,शिक्षक राजपुत सर, रमेश गुळवे,भिमराव नरवाडे,रामदास पंडित,दादाराव गायकवाड, देविदास घायवट,आण्णा गायकवाड,विष्णू बुरंगे, अनिल गुळवे,समाधान गायकवाड,ताराचंद घायवट,आप्पा शेळके,मारोती गुळवे,गोविंदा नरवाडे,कृष्णा गुळवे,अनिल चिंचपुरे,दिनकर नरवाडे,समाधान कांबळे,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.