शालेय मुलभुत गरजेचे बाबत शिक्षकांची तत्परता महत्वाची - सोळंके सिंगोना जि.प. शाळेत पाठयपुस्तके वाटप परतुर - प्रतिनिधी/प्रभाकर प्रधान/ शालेय सुविधेबाबत त्या त्या शाळेतील शिक्षकांची तत्परता तितकीचं महत्वाची असुन यामुळे विद्यार्ध्यांच्या शीक्षणीक प्रगतीला वेग मिळत असतो असे मत सिंगोना शिवसेनेचे संरपच सुर्दशन (बप्पा) सोंळंके यांनी व्यक्त केले. आज दि. 17 जुन 2019 रोजी सिंगोना जिल्हा परीषद शाळेत पाठयपुस्तक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समीतीचे परमेष्वर सोंळके, उपसरंप बाबुराव गरड, रख्माजी मेत्रे, शिवाजी मेत्रे, प्रभाकर सोळंके, बाळासाहेब सोनपसारे, गजानन सोंळके, हरि सोळंके , मुख्यध्यापक काकडेसर, ढवळे सर, लहाणे सर, सांवत सर, केंद्रे मॅडम, अंबुलढगे मॅडम, ससाणे मॅडम यांची उपस्थीती होती. यावेळी बोलतांना सोंळके यांनी पुढे म्हटले की, शासनाकडुन शिक्षणाबाबत अनेक योजना राबवल्या जातात मात्र त्याच्या पाढपुरवाव्या बाबत आपण कुठेतरी कमी पडत असल्याने गरजु विदयाथ्र्याला त्या लाभापासुन वंचित रहावे लागते. यासाठी संबधीत शाळेती शिक्षकांनी जागरूक राहुन आपल्या शाळेला काय हवे याबाबत शालेय व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विदयाथ्र्याचा पाया मजबुत करण्यासाठी शिक्षण चळवळ काळजीपृर्वक हाताळावी व यासाठी शिक्षका सोबत पालकांचा सहभाव तितकाचं असावा असे ते शेवटी म्हणाले. दरम्यान यावेळी या शाळेतील विदयार्थी सिंध्यात भरत सोनपसारे यांने नवोदय प्रवेष परीक्षेत यश संपादन केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्य व पाठयपुस्ताकांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकांची मोठयासंखेने उपस्थीती होती.