शेष पोलीस महा निरीक्षक पी पी मुत्याल यांची परतूर पोलीस ठाण्यास भेट एम एल कुरेशी. विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद पी-पी मुत्याल यांनी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी परतूर पोलीस ठाण्यास भेट दिली. त्यांच्या सोबत जालन्याचे पोलीसअधीक्षक एस चैतन्य. परतूरचे पोलीस उप विभागीय अधिकारी संतोष वाळके उपस्थित होते. परतूर पोलीस ठाण्याचे.पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे. यांनी त्यांना परतूर येथील कायदे विशयी संपूर्ण माहिती दिली, व गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी, करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात तपशीलवार माहितीदिली. सणा-सुदीच्या काळात काहीही अप्रिय घटना घडू नये, व शांततेने सर्व सण साजरे व्हावेत, व यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्या विषयी संबंधित पोलीस अधिकारयांना सुचना दिल्या. दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पी.पी. मुत्याल, यांनी पहिल्यांदा परतूर पोलीस ठाण्यास भेट दिली म्हणून, परतूर येथील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे सत्कार केले, या मध्ये परतूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री सुरेशकुमार जेथलिया,परतूर नगर परिषदचे उपनगराध्यक्ष रहिमोदीन कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष अकीलोदीन काजी,नगर परिषदचे ओ. एस. चव्हाण.नगर अभियंता सय्यद सऊद, नगर सेवक अय्यूब कुरेशी, जमील कुरेशी, राजेश भुजबळ , वैजनाथ बागल,कदीर कुरेशी, पत्रकार. वायाळसर, बरीदेसर, सरफराज नाइकवाडी, एम एल कुरेशी, समाजिक कार्यकर्ते खालेक कुरेशी, इत्यादीचा समावेश आहे.अशी माहिती डीएचबी गुप्त शाखेचे पोलीस श्री गुंजकर, यांनी दिली.