लहानपणापासूनच देशसेवेची आवड - लेफ्टनंट राहुल खंडेलवाल परतूर,प्रतिनिधी प्रभाकर प्रधान // लहानपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती.देशसेवत स्वतः ला वाहून घ्यायचे असे बालपणीच ठरविले होते असे प्रतिपादन लेफ्टनंट राहुल खंडेलवाल यांनी लॉयन्स क्लब ऑफ परतूर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ सोहळ्यात केले.यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक तुकाराम उबाळे,डॉ.प्रमोद आकात,रामेश्वर नळगे, मनोहर खालापुरे,डॉ.भानुदास कदम,राहुल यांच्या आई सरला खंडेलवाल,संजीवनी खालापूरे,अलका टेकाळे,शालिनी पिंपळे,मनिष अग्रवाल,विश्वम्बर बहिवाल,पुरुषोत्तम राठी,लॉ.प्रा.प्रमोद टेकाळे,मुकुंद शेपाळ आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना राहुल खंडेलवाल म्हणाले की,माझे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात सिव्हील इंजिनियर म्हणून नौकरी करतात. त्यांनाही असे वाटत होते की,माझ्या मुलाने पण सिव्हील इंजिनियर ही पदवी घेतलेली असून नौकरी करावी परंतू मी माझ्या वडिलांना सांगितले की,मला देशसेवा करायची आहे तर वडिलांनी लगेच होकार दिला आणि सिव्हील इंजिनियर ही पदवी मिळविल्यानंतर मी हे खडतर शिक्षण पूर्ण केले व बेंगलोर येथे लेफ्टनंट पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून आज त्यांची लेफ्टनंट म्हणून जम्मू काश्मीर च्या पठाणकोट या भागात नियुक्ती झाली.राहुल खंडेलवाल यांनी शेवटी सांगितले की,ज्यांना असे वाटत असेल की,सैनिकी जीवन हे खडतर असते परंतु मी सांगतो की,हे जीवन खडतर नसून प्रत्येकाने डॉक्टर इंजिनियर होण्यापेक्षा सैनिक झाले पाहिजे व देशसेवा केली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अध्यक्षीय समारोप तुकाराम उबाळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढवळे सर यांनी केले तर आभार मनिष अग्रवाल यांनी मानले.या प्रसंगी शहरातील विद्यार्थी, नागरिक,माता भगिनी,सर्व लॉयन्स क्लब चे सदस्य व खंडेलवाल परिवाराचे सदस्य उपस्थित होते.