पदाने मोठे होण्यापेक्षा, माणुसकीने मोठे व्हा ! -शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांचे विद्याथ्र्यांना आवाहन शांतीनिकेतन विद्यामंदिर शाळेतील गुणवंतांचा गौरव जालना, दि. १२(प्रतिनिधी)-विद्यार्थी दशेमध्ये आपण आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत असतो. कुणाचे स्वप्न डॉक्टर होण्याचे कोणाचे इंजिनिअर, कोणाचे पोलीस अधिकारी होण्याचे, कोणाचे जिल्हाधिकारी होण्याचे असते. अशा वेगवेगळ्या पदांवर जाण्याचे स्वप्न आपण बघत असतो. ही सर्व पदं ही साध्य मानू नका, ही सर्व पदे जनसामान्यांची सेवा करण्याचे साधन माना, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. जालना शहरातील शांतीनिकेतन विद्यामंदिर या शाळेतील गुणवंत विद्याथ्र्यांच्या गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या शाळेचा दहावीचा निकाल ८५ टक्के लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने याही वर्षी कायम राखली. यावेळी व्यासपीठावर संभाजीनगर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, संभाजीनगर मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अंकुशराव रंधे, संस्थेचे सचिव बिजू वाघमारे, उपाध्यक्ष प्रा.राम कदम, संचालक रामचंद्र चौधरी, हरिहर शिंदे, मिलिंद काळे, जिल्हा उद्योग वेंâद्राचे प्रकल्प संचालक कांतीकराव दांडगे, विनोद वीर, पांडूरंग काळे, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, आयुष्यात पद व पैसा या गोष्टी प्राप्त झाल्यास जीवनात सुख-समृध्दी येईल हा खोटा समज आमच्या भारतीय मानसिकतेत रुजलेला आहे. परंतु चांगले संस्कार व चारित्र्य याच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी पडणे, लोकांना आधार देणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत महत्वाचे आहे ते जीवनात रुजवून घेतले पाहिजे. भावी आयुष्यात मला जे कोणते पद मला प्राप्त होईल त्याचा वापर देश व समाजासाठी करील, असा दृढनिश्चय आजच मनाशी करा. पद आणि पैश्याने मोठे होण्यापेक्षा माणसाने माणुसकीने मोठे व्हा. जीवनामध्ये शिक्षण घेण्याबरोबरच प्रचंड वाचन करा, थोरांमोठ्यांची चरित्रं वाचा, देशामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य देश व समाजासाठी खर्च केले. त्यांचा आदर्श आपल्या डोळयसमोर ठेवा व जीवनात या प्रमाणाने आचरण केल्यास तुम्ही खुप मोठे व्हाल. तुमच्या भावी आयुष्यास याच माझ्या सद्च्छिा असल्याचे ते म्हणाले. याच कार्यक्रमात संभाजीनगर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनीही विद्याथ्र्यांना शुभेच्छा देवून जीवनात मोठी स्वप्ने बघून ती पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे, असे सांगितले. या कार्यक्रमात शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी अभिषेक गजानन पैठणकर, व्दीतीय यशोदा हरिश्चंद्र विश्वकर्मा, तृतीय आकाश मुक्ताजी कोल्हे या विद्याथ्र्यांचा पालकांसह रोख बक्षिसे व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. तसेच सर्व उत्तीर्ण विद्याथ्र्यांनाही पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्याथ्र्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मदनराव खरात, युवराज ठावूâर, संदीप गावडे, धनंजय जाधव, मधुसुदन दंडारे, मुख्याध्यापक अंबादास घायाळ, ज्ञानेश्वर गाढवे, शिक्षक रमेश गाढवे, राजेश कुलकर्णी, प्रेमला जाधव, कांचन वाघ, संदीप वाखारकर, सुर्यकांत बेले, अशोक माधवले, मोहन भदाडे, पांडूरंग वाजे, शिवहरी मान्टे, अमोल पवार, गजानन दळवी, शिवराम गिराम, सुनिल जाधव, पुरुषोत्तम चौरे, किर्ती खैरे, अनिता जाधव, संजय खरात, वसंत गाडेकर, रामेश्वर कुरिल यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. ०००० फोटो ओळी.... जालना : शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत दहावीतील गुणवंत विद्याथ्र्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, अंकुश रंधे, उपाध्यक्ष राजेश राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी हरिहर शिंदे, बिजु वाघमारे, प्रा. राम कदम, रामचंद्र चौधरी आदी छायाचित्रात दिसत आहे