परतुरात महाराणा प्रताप गणेश मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न परतूर : प्रतिनिधी-येथील गाव भागातील महाराणा प्रताप गणेश मंडळाच्या वतीने व जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरांमध्ये जवळपास शंभर रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यावेळी प्रभागाचे नगरसेवक कृष्णा आरगडे यांच्यासह माजी नगरसेविका श्रीमती संगीता ताई दाजी यांनी रक्तदान करून यात सहभाग नोंदविला या शिबिरात तरुण मुलांसह, नागरिक, पुरुष व महिलांनी सहभाग घेतला, सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष: आजय सिंग राजपुत, उपध्यक्ष:शुभम भुसारे, सचिव: रवि राजपुत, सहसचिव:विक्रम राजपुत, कोषाध्यक्ष:आकाश राजपुत, सहकोषाध्यक्ष:राजु राजपुत, कार्याध्यक्ष:गणेश राजपुत, सहसल्लागार:भगतसिंग राजपुत, प्रदीप राजपुत, गोकुळसिंग राजपुत, दीनेश राजपुत, नंदु राजपुत, रामेश्वर राजपुत, श्रीराम राजपुत, सदस्य: महाराणा प्रताप मिञ मंडळ प्रल्हादपूर आदींनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमात रक्तदात्याने नगरसेवक कृष्णा आरगडे, नगरसेवक अखिल काजी, मा, नगरसेविका श्रीमती संगीताताई ताजी ठाकूर, व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले, या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे