बीडबायपासचे अभूतपूर्व होणार सहापदरी रुंदीकरण तीन भूयारी मार्ग, दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन आमदार संजय शिरसाट यांच्या प्रयत्नातून ३८३ कोटी मंजूर हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून होणार रस्त्याचे काम संभाजीनगर (04) :- संभाजीनगर शहराची लाईफ लाईन बनलेल्या बीडबायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेला प्रश्न मार्गी लागला. गेल्या पाच महिन्यात या बीडबायपासवर झालेले अपघात व त्यामुळे उदध्व्स्त होणारी कुटुंबे, अनाथ होणारी मुले यांचा सारासार विचार करुन आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर या बीडबायपास रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गांभीर्याने मांडला. दळणवळणा बरोबरच सामाजिक दृष्ट््या या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून या रस्त्यासाठी ३८३ कोटी रुपये मंजूरीची शासनाने मान्यता दिली. बीडबायपास रस्त्यावर गेल्या पाच महिन्यात मोठ््या प्रमाणावर अपघात झाले जानेवारी ते मे या कालावधीत बायपासवर रस्ता अपघातात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला. बीडबायपास हा अपघाताचा रस्ता म्हणून ओळखला जावू लागल्याने सातारा, देवळाई, बीडबायपास या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. बीडबायपास रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनू लागल्याने अनेकांनी बीडबायपासला जाणे टाळले होते. काहींनी तर बायपास ओलंडावा लागतो म्हणून त्या भागातील नागरिकांनी स्वतःची घरे भाड््याने देउन शहरात घरे भाडय़ाने घेण्यास सुरवात केली. बायपासवर वाढते अपघात बघता आमदार संजय शिरसाट यांनी बीडबायपास रस्त्याची पहाणी केली. अपघात झाले की नागरिक अवजड वाहानांच्या विरोधात रस्त्यावर उतरु लागले. जनतेसोबत आमदार शिरसाट यांनीही रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. अतिक्रमण आणि रुंदीकरणाचा प्रश्न भेडसावला :- बीडबायपासवर मोठ््या प्रमाणावर होणारे अपघाताला या रस्त्यावरील अतिक्रमण आणि रुंदीकरण हे दोन महत्वाची कारणे समोर आली. आमदार संजय शिरसाट यांनी महापालिकेला बीडबायपासवरील अतिक्रमण काढावी यासाठी पत्रव्यवहारही केले. मार्च महिन्यात एकाच आठवड़य़ात तीन महिलांचा ट्रकखाली चिरडून अपघात झाला त्यामुळे आमदार संजय शिरसाट, पोलीस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांनी बीडबायपासवर जमलेल्या नागरिकांचा जबिंदा ग्राउंड येथे बैठक घेतली. त्याच दिवशी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला फोनवरुन अतिकमण काढण्याच्या सुचना दिल्या. मात्र अतिक्रमण विभागाने येण्यास दिरंगाई केल्याने स्वतः पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी अतिक्रमण धारकांना स्वतः अतिक्रमण काढून घेण्याची ताकिद दिली. आमदार संजय शिरसाट यांनी अतिक्रमणासाठी पुढाकार घेतल्याने मोठया प्रमाणावर अतिक्रमण निघाले. भूसंपादन आणि रुंदीकरणासाठी महापालिकेत खडखडाट :- बीडबायपासवरील अतिक्रमण काढल्यानंतर काही भागातील भूसंपादन करण्यासाठी भूसंपादनाचे काम रखडले. भूसंपादनासाठीच पैसे नाही तर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेकडे पैसे कोठून येणार आहे. महापालिकेची आार्थिक परिस्थिती जाणून असल्याने आमदार संजय शिरसाट यांना बीडबायपास रस्त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा प्रकल्प पूर्ण करून घेणे अत्यंत गरजेचे वाटले. त्यांनी बीडबायपास रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिकार््यांना या रस्त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण़्याचे सांगितले. मॉडेल कोणतेही असू रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे :- बीडबायपास रस्त्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला होता. येथे नागरिकांचे जीव चालले होते. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांना बीडबायपास रस्त्यावर होणारे अपघात आणि त्यामुळे लोकांचे गेलेले जीव याची सविस्तर माहिती दिली. त्याच्या प्रस्तावाची दखल घेउन बांधकाम मंत्री यांनी मंत्रीमंडाळाच्या उपसमितीसमोर बीडबायपास रस्त्याच्या १५ किलोमीटरचा प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावाला उपसमितीने ३८३ कोटीची मान्यता दिली. हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून हा प्रकल्प होणार आहे. काय आहे हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल :- राज्यातील रस्त्यांच्या सर्वागिण विकास करण्याकरिता मोठया प्रमाणावर रस्ते सुधारणा करण्यात करिता केंद्र शासनाच्या हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या धर्तीवर राज्यात हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेल सुरु करण्यात आला. याच मॉडेलमध्ये आता बीडबायपासचा रुंदीकरण सहा पदरी होणार आहे. या रस्त्याचा खर्च ४० टक्के सरकार तर ६० टक्के खर्च खासगी सहभागातून होणार आहे. त्यात १५ वर्षे ठेकेदारालाच या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. ३८३ कोटीत होणार प्रशस्त ६ पदरी रस्ता :- हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून हा १५ किलोमीटरचा रस्ता राहणार आहे. त्यासाठी अंदाजीत रक्कम ३८३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रेन्ट राहणार आहे. तीन भूयारी मार्ग :- या रस्त्याला क्रॉस करण्यासाठी तीन भूयारी मार्ग ठेवण़्यात आलेले आहेत. हे भूयारी मार्ग एमआयटी कॉलेज सिग्नल जवळ, दुसरा संग्रामनगर उडड़ाणपुलाजवळ आणि तिसरा भूयारी मार्ग देवळाई चौक येथे राहणार आहे.