ग्रामीण भागांच्या विकासासाठी पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर-पालकमंत्री बबनराव लोणीकर* //पर तु र प्रतिनिधी प्रभाकर प्रधान // *परतूर तालुक्यातील १३ कोटी ४७ लक्ष किमतीतीच्या रस्ते कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते शुभारंभ* *जिल्ह्यात ४६ चारा छावण्यांना मंजुरी, जालना जिल्ह्यात ६६७ टँकरच्या माध्यमातुन पाणी पुरवठा ६९३ विहिरींचे अधिग्रहण, रोहयोच्या माध्यमातुन मागेल त्याला काम ७५२ कामावर २६ हजार ९८७ मजूर कार्यरत -पालकमंत्री बबनराव लोणीकर* दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी रस्तेविकास हा अत्यंत महत्वाचा घटक असुन शासनाने रस्ते विकासावर भर दिला आहे देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये रस्त्याची फार मोठी मोलाची भूमिका असुन दळणवळण अधिक सुलभ व जलदगतीने होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाडी,वस्ती, तांडे व गावांमध्ये पक्क्या व मजबुत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र राज्य व जिल्हा नियोजन समिती मार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. बहुंतांशी गावाशी जोडणारे पक्के व डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले आहे अशी माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंर्तगत १३ कोटी ४७ लक्ष किमतीच्या २ रस्ते कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी नामदार लोणीकर बोलत होते आज माळेगाव तालुका मंठा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजिमा 26 ते माळेगाव रस्ता भूमिपूजन लांबी - २. ६० कि. मी. किंमत- १ कोटी ८ लक्ष हातडी तालुका परतूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खांडवीवाडी-दैठणा - हातडी रस्ता भूमिपूजन लांबी ४.५६ कि.मी.किंमत २ कोटी ५४ लक्ष कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले कि जालना जिल्ह्यात रस्ते विकासासाठी आजपर्यंत जवळपास ७ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. शेगाव ते पंढरपूर या ४३० किलोमीटर अंतराच्या पालखी मार्ग रस्त्याचे कामही वेगाने सुरु आहे. जिल्ह्यातुन ९५ किलोमीटरचा हा रस्ता जात असुन यामुळे शेतकऱ्यांचा माल कमी वेळात व कमी पैशात बाजारपेठेमध्ये पोहोचण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार होऊन वारकऱ्यांचीही सोय या मार्गामुळे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासासाठी मंत्रीपदाची धुरा सांभाळताच आपण जिल्ह्यातील संपुर्ण रस्त्यांची माहिती घेऊन पुढील ५ वर्षात करावयाच्या रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातुन जिल्ह्यात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे यांना सातत्याने भेटुन जिल्ह्याच्या रस्ते विकास करण्यासाठी सातत्याने मागणी केली.महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच लमाण, बंजारा इ. (विजाभज प्रवर्गातील) तांडे, वस्त्यांना काँक्रिट रस्ते, वीज, पाणी, शौचालये, गटार, समाजमंदिर आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे ग्रामीण भागासाठी कै. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना राबविण्यात येते. या योजनेतून परतूर विधानसभा मतदार संघात २२ तांडा वस्तीसाठी सुमारे १ कोटी ६ लक्ष कोटी रुपयांचा निधीस विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभागाने मंजुरी दिली आहे नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती/गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून परतूर विधानसभा मतदार संघात ३८ गावांसाठी/ वस्तीसाठी सुमारे १ कोटी ९६ लक्ष कोटी रुपयांचा निधीस सामाजिक न्याय विभागाने मंजुरी दिली आहे २५१५ ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे २०१८-१९ या वर्षससाठी योजनेला जालना जिल्ह्यसाठी २८६ गावासाठी १५ कोटी निधी मिळाला आहे. यामध्ये परतूर विधानसभा मतदार संघातील १२८ ठिकाणच्या कामांचा समावेश करण्यात आला असून कामांना यासाठी ५ कोटी रुपयाच्या निधीला ग्राम विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे मतदार संघातील तीनशे गावांना येणाऱ्या काळात रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सोई-सुविधा पुरविण्यात येणार असुन गावात होणाऱ्या प्रत्येक विकास कामांना गावकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.१७६ गावांसाठी एकत्रित ग्रीड पद्धतीची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे ती लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्याचसोबत नव्याने जालना, व मंठा तालुक्यातील ९२ गावांसाठी ग्रीड पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ७६८ लाभार्थ्यांना आजपर्यंत ८२७ कोटी १८ लाख ६६ हजार रक्कमेची कर्जमाफी झाली झाली असुन पात्र व गरजूला शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.पीककर्ज वाटपात जालना जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात ३१९ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मागील कालावधीत शासनाने ६५४ कोटी रुपये एव्हढे दुष्काळी अनुदान जालना जिल्ह्यासाठी वाटप केले असून अशा विविध प्रकारच्या उपाययोजनातून सातत्याने शेतकऱ्यांच्या [पाठीशी उभे राहिले आहे. त्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री मा. श्री सुधीर मुनगंटीवार, यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे मोदी सरकारने पुन्हा सत्तेत येताच शेतकऱयांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत आता सर्व शेतकऱयांना वार्षिक सहा हजार रूपये देण्यात येणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना ही फक्त देशातल्या कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱयांसाठीच लागू करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने जो जाहीरनामा आणला होता त्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सगळय़ा शेतकऱयांसाठी लागू करण्यात येईल, असे वचन देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱयांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने हे आश्वासन पूर्ण केले आहे. या योजनेचा लाभ देशाल्या 14 कोटींपेक्षा जास्त शेतकऱयांना होणार आहे .महाराष्ट्र राज्यात आज रोजी १५ हजार९९४ गावे -वाड्यां मध्ये ६ हजार४४३ टँकर्सने 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून जिल्ह्यात ४६ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून ३२ सुरु आहेत या छावण्यांमध्ये १८ हजार ३४७ मोठे व ३ हजार १९२ लहान अशी एकूण २१५३९ जनावरे दाखल झाली असून जालना जिल्ह्यात ६४६ गावे वाड्यांना ६६७ टँकरच्या माध्यमातुन पाणी पुरवठा सुरु आहे याशिवाय ६९३ खाजगी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. जनावरांच्या चारा छावणीसाठी लागेल ती मदत सरकारतर्फे दिली जाईल अशी माहिती पालकमंत्री लोणीकर यांनी दिली राज्याचे पाणी पुरवठा व स्वछता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली जनावरांची संख्या लक्षात घेता चारा छावण्या सुरु कराव्यात असे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून प्रति जनावर आता ९० रुपयांऐवजी १०० रुपये अनुदान मिळणार आहे* , चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणाची खरेदी आणि त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस १८ किलो हिरवा चारा आणि आठवड्यातून तीन दिवस १ किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी ९ किलो हिरवा चारा आणि लहान जनावरांसाठी १ किलो पशुखाद्य देण्यात येत असल्यामुळे चारा छावण्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये प्रति जनावर १० रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी १०० रुपये तर लहान जनावरांसाठी ५० रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहिती लोणीकर यांनी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन मागणी केलेल्या मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दुष्काळी अनुदानसाठी आतापर्यंत जिल्ह्यात ३३० कोटी रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात येऊन शेतकऱ्यांना वाटप करणेसाठी तहसिलदाराकडे पाठविण्यात आले आहे. . दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावातील शेतकरी, मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह पिण्यासाठी पाणी, जनावरासांठी चारा उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे अधिकार्यांना दुष्काळी परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याचे , मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले दिले आहेत दुष्काळाशी संबंधित बाबीची अंमलबजावणी करण्यात दुर्लक्ष करणाऱ्या व हि कामे गांभीर्याने न घेणाऱ्या गावपातळी वरील जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा तलाठी, ग्रामसेवक ,कृषी सहाय्य्क पाणी पुरवठा अधिकारी यांच्यावर कडक प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत निर्देश मी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे रोहयोच्या कामात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. आज घडीला एमईआरईजीएसची ७५२ कामे सुरू आहेत. त्यामध्ये २६ हजार ९८७ लोकांना काम मिळाले आहे. अशी माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली यावेळी माळेगाव येथील कार्यक्रमास भुजंगराव गोरे,बी.डी . पवार, पंजाबराव बोराडे, विक्रम माने, गणेश राव खवणे, नाथराव काकडे, संभाजी खंदारे, राजेश मोरे, संदीप गोरे, अविनाश राठोड, श्रीराम मालदार राठोड, निवास देशमुख ,शंतनु काकडे, नागेश घारे, ज्ञानेश्वर माऊली वायाळ, देविदास राठोड, बंडूभाऊ कवळे, मारुती राठोड, सुरेश राठोड, नारायण राठोड, रवी चव्हाण, सेवकराम राठोड, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री चौधरी, गटविकास अधिकारी श्री गुंजकर, उप अभियंता श्री मस्के आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हातडी येथील कार्यक्रमास भुजंगराव गोरे,विक्रम माने, सुधाकर सातोनकर,रामेश्वर तनपुरे,रमेश भापकर,नितीन जोगदंड,दिगंबर मुजमुले,बद्रीभाऊ ढवळे सुरेश सोळंके,अशोक बरकुले शिवाजी पाइकराव रमेशराव आढाव,मदनराव गोरे,ओमप्रकाश बोरकर,सुभाष झरेकर,दत्तराव फटींग,एकनाथ बोरकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री चौधरी, उप अभियंता श्री मस्के आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते