२.२० लक्ष डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करून राज्यात प्रथम आल्याबद्दल जालना जिल्ह्याचा गौरव जालना- महाभूमी प्रकल्प संस्थेच्यासंकेतस्थळ aapleabhilekh.mahabhumi.gov.in/satbara तसेच महाभूलेख संकेतस्थळावरून mahabhulekh.maharshtra.gov.in जनतेला उपलब्ध करून दिलेल्या ४२ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ पैकी दि.३१.८.२०१८ अखेर डाउनलोड झालेल्या ६.०८ लक्ष ७/१२ पैकी जालना जिल्हा प्रथम क्रमांक (२.२० लक्ष ), उस्मानाबाद(१.११लक्ष ) जिल्हा द्वितीय तर अकोला ( ४१ हजार ) त्रितीय क्रमांकावर.१ मे २०१८ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चा शुभारंभ करण्यात आला होता.१ मे ते ३१ ऑगस्टच्या काळात २.२० लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२डाऊनलोड करून राज्यात प्रथम आल्याबद्दल जालना जिल्ह्याचा गौरव, जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे ७/१२संगणकीकरण समन्वयक श्री रामदास जगताप यांचे हस्ते, औरंगाबाद येथे विभागीय कार्यशाळेत करण्यात आला.जिल्हा सुचना-विज्ञान अधिकारी रविकुमार पडुळ्कर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव स्विकारला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत व अद्यावत केल्यामुळे, जनतेने, पिक कर्ज व पिक विमा साठी डिजिटल स्वाक्षरीत ७/१२संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करुन लाभ घेतला .