बीएमडब्ल्यू सर्व्हिसचा खर्च आता पर किलोमीटर 1 रूपयांपासून सुरू संपूर्ण मनःशांतीसाठी फिक्स्ड आणि पूर्वनिश्चित कॉस्ट ऑफ सर्व्हिस. आपल्या ग्राहक सेंट्रिक उपक्रमांचा भाग म्हणून बीएमडब्ल्यू इंडियाने आपल्या भारतातील ग्राहकांसाठी आकर्षक कॉस्ट ऑफ सर्व्हिसची घोषणा केली आहे. बीएमडब्ल्यू सर्व्हिस इन्क्लुसिव्ह पॅकेजेसमधून आता बीएमडब्ल्यू गाड्यांच्या संपूर्ण श्रेणीसाठी मालकीचा सर्वोत्तम अनुभव दिला जातो. बीएमडब्ल्यू सर्व्हिस इन्क्लुसिव्ह पॅकेजेसमधून पेट्रोल व्हेरिएंटसाठी 97 पैसे पर किलोमीटर इतक्या कमी दरात आणि डिझेल व्हेरिएंटसाठी पर किलोमीटर 1.38 रुपये दर दिला जातो. याशिवाय, इतर सर्व्हिस पॅकेजेसचा खर्च सुमारे 50% नी कमी झाला आहे. ग्राहक आपल्या प्राधान्याचा कालावधी आणि मायलेजनुसार विविध प्रकारच्या सेवा योजनांची निवड करू शकतात. डॉ. हान्स ख्रिश्चन बार्टेल्स, प्रेसिडेंट (अॅक्ट) बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्हणाले की, “बीएमडब्ल्यू जे काही करते त्याच्या केंद्रस्थानी तिचे ग्राहक असतात. आम्हाला हे कळते की आलिशान गाडी खरेदी करण्याचा निर्णय उत्पादनावर तसेच सेवेचा दर्जा आणि खर्चावर आधारित असतो. बीएमडब्ल्यू मध्ये आम्ही सातत्याने आमच्या ग्राहकांना दीर्घकालीन मूल्य देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीसाठी कमी कॉस्ट ऑफ सर्व्हिस देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. बीएमडब्ल्यू प्रामुख्याने वैविध्यपूर्ण ग्राहक अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असते आणि हे फक्त त्याच्या प्रीमियर उत्पादनांद्वारेच नाही तर प्रीमियम सेवांद्वारेही शक्य होते