साल गड्याच्या शोधार्थ बळीराजाची भटकंती... साल वाढण्याची शक्यता दुष्काळी परिस्थितीमुळे सालगडी ठेवणे अडचणीचे परतुर :-(अजय कांबळे) आज गुढीपाडवा सण साजरा झाला मात्र सणावर दुष्काळाच्या झळा दिसू लागल्या या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सांगण्याची नियुक्ती करतात , यंदा मात्र गावातील सोडा जिल्ह्यातील सालकरी मिळणे कठीण झाले आहे शेतात वर्षभर काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या साल गड्याच्या शोधात शेतकरी जिल्ह्यात व पर जिल्ह्यात फिरत असल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांच्या नववर्षाला गुढी उभारून होत आहे काहि गावात होळीचे मांडावास या काळात वार्षिक मजुरी ठरवून सालकरी म्हणून ठेवण्याची प्रथा आहे तर परतूर तालुक्यातील काही गावात गुढीपाडव्याच्या नव्या शांकर यांचे वार्षिक वेतन ठरून कामावर शेतमजूर म्हणून रुजू करण्यात येते, या वर्षी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे आर्थिक दृष्ट्या हवालदिल असणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे सालकरी ठेवण्याचा प्रश्न कायम असला तरी शेती तर कासावीस लागणार बैलजोडी ठेवावी लागणार, याची नितांत आवश्यकता असल्याने आपल्या स्वखर्चाने कपात करून नव्या सलकार्याच्या शोधार्थ या परतूर तालुक्यातील सदन शेतकरी भटकंती करीत आहे, सालकरी ठेवताना वर्षाकाठी एक रक्कम व धान्य देण्याचा कल आहे यात यंदाच्या वर्षी 70 ते 80 हजार रुपये देण्याचा दर शेतकऱ्यांना देण्याचा कल आहे या सोबत दर महिन्याला गहू व ज्वारी देण्यात येते, जालना जिल्ह्यात यंदा दुष्काळ परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच पाऊस नसल्याने काहीच उत्पन्न झाले नाही यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पुरती आहे पैसे मोजून सालकरी ठेवणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा सारकारी ठेवण्याकडे पाठ दाखविण्याचे चित्र आहे गावात बळीराजा त्यांच्याकडे असलेल्या सालकार्याला नियमित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे, जुन्या सालकर्याला शेतकऱ्याची स्थिती माहीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा होत आहेत, तालुक्यात कोरडवाहू शेती असल्याने सांलकरी म्हणून राहणाऱ्यांची संख्या कमी आहे ,त्यात काही वर्ष अगोदर पर जिल्ह्यातील बहुतांश परिवार रोजगार मिळवण्यासाठी येथे आले होते ,ते काही वर्षे येथे राहून रोज मजुरी करायचे , सध्या ते त्यांच्या जिल्ह्यात परत गेले, गत पाच वर्षाच्या काळात मजुरांना सालकरी म्हणून मिळणाऱ्या वेतनापेक्षा विहिरीवरील कामावर, ट्रॅक्टर वरील कामात, तसेच नवीन बांधकामावर काम केल्यास अधिक मजुरी मिळू लागली, युवा मजुरी करणाऱ्यांचा कल शेती करून दूर झाला, वर्षात 70 ते 80 हजार रुपये मजुरी सहकाऱ्यांचे होती यात कमी जास्त वेतन असले तरी महिन्याला पाच कुडव 840 पायलेट गहू देण्याची प्रथा आहे