दिशाहीन समाजाला बुद्धाच्या मार्गानेच उन्नत पथालाजाता येईल... भदन्त उपगुप्त महाथेरो* वैजापूर (प्रतिनिधी) :- समाज सर्वदृष्टीने दिशाहीन अवस्थेतुन जात असताना बुध्द धम्म संघाच्या मार्गाने गेल्यामुळे सर्वांगीण उन्नती साधल्या जाऊ शकेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाचे सचिव ड़ॉ भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी केले . गंगापुर तालुक्यातील राजनगाव कम्मभूमी (नरहरी) येथे गंगापुर - वैजापूर तालुक्याच्या वतीने अखिल भारतीय चौथी बुद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली यावेळी ते अध्यक्ष पदावरुन बोलत होते. पुढे ते म्हणाले की धर्माच्या-व जातीच्या नावावर देशाला ऐका मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न काही घटनाविरोधी राज्यकर्ते करत आहेत. त्यांचा तो प्रयत्न सर्व बहुजन बांधवानी एकत्र हानुन पाडला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. या धम्मपरिषदेच्या सुरुवातीला भिक्खु करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. व भिक्खु निवासाचे भूमिपूजन समस्त भिक्खु संघाच्या हस्ते करुन बुद्ध ,धम्म वंदनेने परिषदेची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी स्मरणिका प्रकाशित करून या धम्मपरिषदेच्या स्वागत अध्यक्षा मुख्याधिकारी नंदा गायकवाड़ (कन्नड़) यांच्या हस्ते भिक्खु संघाला स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पूज्य भिक्खु नागधम्मो महाथेरो (छत्तीसगढ़), भिक्खु गुणरत्न महाथेरो (नंदुरबार), भिक्खु राहुल थेरो (औरंगाबाद), भिक्खु विमलकीर्ति (कोल्हापुर), भिक्खु कौडीन्य(बंगलोर), भिक्खु राष्ट्रपाल महाथेरो व समस्त भिक्खु-भिक्खुनी संघ यांच्यासह माधवराव बोर्डे, आर.के. गायकवाड़ (माजी समाजकल्याण आयुक्त)यांच्यासह गंगापुर- वैजापूर तालुक्यातील बौध्द उपासक-उपासिका मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी कन्नड़च्या मुख्याधिकारी नंन्दाताई गायकवाड़, भीमराव हत्तीहंबीरे (परभणी), पी.एस. निकम यांना धम्मभूषन पुरस्कार देऊन ग़ौरविन्यात आले.