औरंगाबाद जिल्ह्यात तीन हजार 67 मतदान केंद्रे औरंगाबाद :– औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन हजार 957 मतदान केंद्र होती. विशेष मोहिमेंतर्गत नवीन मतदार नोंदणीचा विचार करून भारत निवडणूक आयोगाने नवीन 110 सहाय्यकारी मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण तीन हजार 67 मतदान केंद्र झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रिंगी यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन हजार 957 मतदान केंद्रे दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अस्तित्वात होती. आयोगाकडून सहाय्यकारी मतदान केंद्राच्या निकषानुसार एकूण 110 सहाय्यकारी मतदान केंद्राना मान्यता मिळाली आहे. त्याचबरोबर सुस्थितीत नसलेल्या 122 मतदान केंद्राच्या ठिकाण बदलाच्या प्रस्तावही आयोगाकडून मान्य करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना अवगत करण्यात आलेली आहे, असेही श्री. श्रिंगी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.