मंठा येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरीचा पर्यत्न.. मंठा प्रतिनिधी :- मंठा येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरट्यांनी चोरीचा पर्यत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मंठा येथे जालना महामार्ग मुख्य रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे दी. 31मार्च शनिवारी रात्री 2:15 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकच्या मेन गेटचे शटर वाकडे करुन,चँनल गेट मध्ये मोठा दगड टाकून चोरी करण्याच्या पर्यत्न केला होता.व बँके मध्ये लावलेले सीसीटीव्ही कँमेऱ्याची दिशा वर्ती केल्याचे निदर्शनास आले बँकेतील इतर कोठल्याही प्रकारचे नुकसान झाले. नसल्याची फिर्याद बँक मैनेजर प्रमोद सोपानराव सदाफुले यांनी मंठा पोलिस ठाण्यात दिली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बँक मैनेजर हे आपल्या घरी असतांना बँक मध्ये दप्तरी करणारे तुकाराम जाधव यांनी सकाळी 8:30 वाजता मैनेजर साहेबाला फोन लावुन सांगितला की आपली बँक उघडी दिसत आहे.आपन बँकेत काम करत आहे का मैनेजर यांनी सांगितले मी घरी आहे त्यानंतर मैनेजर घरातून पायी बँकेत आले असता मेन गेटचे शटर वाकडे करुन,चँनल गेट मध्ये मोठा दगड टाकून चोरी करण्याच्या पर्यत्न केला असल्याचे बँके मैनेजर प्रमोद सोपानराव सदाफुले यांना कडतच त्यांनी मंठा पोलीस ठाण्यात माहिती दिली या प्रमाणे मंठा येथील पोलिस निरीक्षक त्रिभवन साहेब व पी.एस.आई.चव्हाण साहेब यांनी बँकेत तपास केले असता बँके मध्ये लावलेले सीसीटीव्ही कँमेऱ्याची दिशा वर्ती केल्याचे व निदर्शनास आले बँकेतील इतर कोठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे निदर्शनास आले.बँके मैनेजर प्रमोद सोपानराव सदाफुले यांच्या फिर्यादि वरुण मंठा येथे अज्ञात चोरट्यां विरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढिल तापस केशव चव्हाण हे करत आहे.