सीडस् पार्क प्रकल्पाच्या कामाला गती द्या जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांचे निर्देश जालना – जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या तसेच उद्योग व्यवसाय भरभराटीस आणणाऱ्या सीडस् पार्क प्रकल्पाला गती देण्याबरोबरच यामध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिल्या. सीडस् पार्क प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व कार्यान्वयीन यंत्रणा तसेच सीडस कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय माईनकर, हर्षल देशमुख, महेंद्र धांडे, एस.बी. पोटे, ए.पी चव्हाण, ए.आर. नाईकवाडे, एस.आर. साबळे, एम आय शहा, एस.के. काळे, पी.जी. पाग्रत, सीडस कंपन्यांचे किशोर पांडे, ए.जी. काबरा, सत्यनारायण राठी, आनंद जिंदल आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, केंद्र शासनाच्‍या उदयोग विभागाच्‍या MIIUS योजने अंतर्गत प्रस्‍ताव दाखल करण्‍याबाबत सर्व विभागांनी एकत्रीतपणे कार्यवाही करावी. विविध विभागाने पुढील कालावधीत कशा पध्‍दतीने कामकाज करावे, याबाबत सूचना दिल्‍या. महाराष्‍ट्र राज्‍य औदयोगिक महामंडळ यांनी सदर जागेचे सिमांकन करुन तात्‍काळ Broad master plan तयार करुन पायाभुत सुविधेच्‍या निर्मीतेचे कामकाज सुरु करण्‍याबाबत निर्देश दिले. महाबीज यांनी सिडपार्क क्‍लस्‍टर मध्‍ये सीड टेस्‍टीगं, सीड प्रमाणीकरण, प्रयोगशाळा उभारणीबाबत आपला प्रस्‍ताव सादर करावा, अशा सूचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍या. तसेच महाराष्‍ट्र कृषि विकास महामंडळ यांना त्‍यांचे प्रस्‍ताव सादर करण्‍यास सूचना दिल्‍या.यावेळी जिल्हा समन्वयक अधिकारी राजू नंदकर यांनी सीडस्‍ पार्कबाबत आजपर्यंत झालेली प्रगती, इतर विभागांची भूमिका व येणाऱ्या काळात करावयाचे काम या बाबत पॉवर पाँईटच्या माध्यमातुन माहिती दिली.या बैठकीसाठी जालना,औरंगाबाद येथील 16 उदयोजक सिअॅम व मासा या संघटनेचे प्रतिनिधी सुध्‍दा हजर होते. संबंधित उदयोजकांनी त्‍यांची मागणी व त्‍यांचे सादरीकरण पुढील आठ दिवसात श्री.राजु नंदकर, जिल्‍हा पुरवठा अधिकारी, जालना यांच्‍याकडे जमा करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍या.