शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जालना (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात या वर्षी तीव्र दुष्काळ पडलेला असल्याने चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा-पाण्याअभावी जनावरे कत्तलखान्याकडे जात आहे. अशा या भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर शिवसेनेच्या वतीने हिंदुवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९ वी जयंती अत्यंत साधेपणाने जिल्हा शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते. त्यांनी त्यांच्या काळात रयतेची अत्यंत काळजी घेतली. आज शिवरायांप्रमाणेच भुमिका घेवून दुष्काळात होरपळणाNया शेतकNयांस आधार देण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सुचनेवरुन मिरवणुकीवर होणारा खर्च काही गावातील जनावरांच्या चाNयासाठी देण्यात येणार आहे. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, सभापती पांडूरंग डोंगरे, किसान सेनेचे भानुदास घुगे, युवासेनेचे भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, रावसाहेब राऊत, नगरसेवक विष्णु पाचपुâले यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे, पंचायत समिती सदस्य सुनिल कांबळे, विजय जाधव, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, गणेश कदम, अजय कदम, संदीप झारखंडे, लखन कनिसे, सुमित पाटील, शांताबाई गुंजकर, राधाताई वाढेकर, मंजुषा घायाळ, शोभा खोत, मंगल मिटकर, सुनिता कोलते, दुर्गाताई देशमुख, संगिता नागरगोजे, भरत कुसुंदल, नगरसेवक संतोष जांगडे, संदीप नाईकवाडे, गोपी गोगडे, प्रभाकर पवार, दिपक राठोड, नरेश खुदभैय्ये, दिनेश भगत, भोला कांबळे, बंकट राठोड, आयुष राठोड, बबन काजळे, किशोर शिंदे, बबन मगरे, मुसा परसुवाले, प्रकाश घोडे, रामेश्वर कुरिल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.