साळी समाजातील महिला आणि मुलींसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षणाचा उपजिल्हाधिकारी सौ. रिता मेत्रेवार यांच्या हस्ते शुभारंभ . औरंगाबाद :- साळी समाजातील महिला व मुलींनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेवून आत्मनिर्भर व्हावे याकरीता *औरंगाबाद येथील* *वर्ल्ड साळी फाउंडेशन चे संपर्क प्रमुख श्री.वैभव ढोरजे* *यांच्या संकल्पनेतून* *तसेच त्यांच्या पत्नी सौ.माधुरी ढोरजे,साळी समाजातील भगिनी सौ.वर्षा सातपुते व श्रीमती मालती रोजेकर यांच्या मदतीने मोफत व्यवसाय प्रशिक्षण शिबिरा चा शुभारंभ औरंगाबाद जिल्हयाच्या उपजिल्हाधिकारी सौ.रिता मेत्रेवार यांच्या शुभहस्ते* संपन्न झाला. श्री. जिव्हेश्वर मंदिर व मंगल कार्यालय ट्रस्ट औरंगाबादचे अध्यक्ष श्री. संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. *सहाय्यक कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई चे श्री.विजय वक्ते यांच्या प्रमुख संयोजनाखाली पार पडला.* *व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या समाजातील गरीब व गरजू महिलांना वर्ल्ड साळी फाउंडेशन तर्फे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे जाहीर करण्यात आले.* सौ.सुजाता संजय उपरे यांच्या शासनमान्य प्रशिक्षण संस्थेव्दारे प्रशिक्षण पूर्ण करनार्या महिलांना प्रमाणपञ देण्यात येणार आहे. समाजातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद बघून प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षा साठी वाढवण्याचे ठरले. *तसेच अध्यक्षांनी प्रशिक्षण घेनार्या महिलांसाठी वह्यांचे वाटप केले.सदर कार्यक्रम सिङको विभागातील जिव्हेश्वर मंदिर व मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. *या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलेश राजकडे यांनी केले तर प्रास्ताविक श्री. वैभव ढोरजे यानी केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री. संजय सरोदे यांनी केले.* प्रारंभी सर्व प्रमुख उपस्थिताचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ जिव्हेश्वराच्या सामुहिक आरतीने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद येथील श्रीमती प्रतिभा बोबडे, श्री.अशोक राजकडे, श्री. शाम कांबळे, श्री. शरद लोकरे, श्री. दत्तात्रय वर्‍हाडे,श्री. विलास सरोदे, श्री. बाळासाहेब सरोदे,श्री. श्री. गंगाराम बर्वे बाबा व सर्व संपर्क प्रमुखांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी सौ.सुजाता संजय उपरे, सौ.रेखा विजय बोके, सौ.नीलिमा संतोष लोंढे, अॅङ. स्वाती सुरेश लंगोटे,सौ. शोभना विलास सातपूते,सौ. अश्विनी अशोक राजकङे , सौ.शीतल तलबे,सौ. सुषमा राजेद्र माजरे ,सौ.रेखा शरद लोकरे,सौ. अनुजा काबंळे,सौ. ज्योती हंगे, प्रतिभा बोबडे , सौ. सुषमा साळी, आदिचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संपर्क प्रमुख म्हणून सर्वश्री. संजय सोनारे, विलास सोनारे, सुनिल पावले, प्रदीप भागवत, महेश काबंळे, बिपीन आचारी , तेजस आचारी , सुरेश लंगोटे, नवनाथ गोमधरे,आदि बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जिव्हेश्वर मंदिर व मंगल कार्यालय ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, न्यू. जिव्हेश्वर सहकारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, साळी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी , समाजातील सर्व ज्येष्ठ समाजसेवक आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.